सरकार परत घेणार शेतकऱ्यांचा ‘सन्मान’; तुमचा तर यात समावेश नाही ना

नीलेश डोये
Monday, 9 November 2020

शेतकरी सन्मान निधीसाठी जी पात्रता देण्यात आली आहे; त्यात सर्वात प्रमुख अट हीच होती की ते करदाते नसावेत. तरीही करदात्या शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेतल्याचे सांगितले जाते. दोन हजार प्रती महिन्याप्रमाणे चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यात जिल्ह्यातील एक लाख आठ हजार शेतकऱ्यांना पैसे देण्यात आलेले आहेत.

नागपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्यांत दोन हजार रुपये देण्यात येते. यासाठी केंद्र सरकारकडून काही निकष निश्चित करण्यात आले होते. या निकषात मोडत नसलेल्यांनीही अर्ज भरून लाभ घेतला. ही बाब सरकारच्या लक्षात आल्याने आता अशा अपात्र शेतकऱ्यांकडून दिलेला निधी परत घेण्यात येणार आहे.

ऑनलाईन नोंदणी करताना काही शेतकऱ्यांनी खोटी माहिती भरली. यात नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास करदाते शेतकरी व इतर असे जवळपास पाच हजारांवर शेतकऱ्यांना हा निधी परत करावा लागणार आहे. शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

शेतकरी सन्मान निधीसाठी जी पात्रता देण्यात आली आहे; त्यात सर्वात प्रमुख अट हीच होती की ते करदाते नसावेत. तरीही करदात्या शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेतल्याचे सांगितले जाते. दोन हजार प्रती महिन्याप्रमाणे चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यात जिल्ह्यातील एक लाख आठ हजार शेतकऱ्यांना पैसे देण्यात आलेले आहेत.

अपात्रेची कारणे

या योजनेच्या लाभासाठी काही निकष आहेत. त्यानुसार शेतकरी करदाता, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, डॉक्टर, वकील व सीए नसावा. या अटींचे पालन न केलेले तसेच मृत आदी अपात्रतेची कारणे आहेत.

जाणून घ्या - आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून

अपात्र शेतकऱ्यांची यादी
अपात्र शेतकऱ्यांची यादी असून, त्यांना निधी परत करण्यासाठी माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी निधी परत न केल्यास संबंधित बॅंकेला पत्र पाठवून निधी कपात करून शासन जमा करण्यात येईल.
- रवींद्र खजांजी,
निवासी उपजिल्हाधिकारी, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will have to return the sanman fund