‘फोन पे कार्यालयातून बोलत आहे, तुमच्या तक्रारीचे समाधान करणार आहे’ यावर विश्वास ठेवला अन्

Ninety thousand rupees extracted by cyber criminal hack Nagpur crime news
Ninety thousand rupees extracted by cyber criminal hack Nagpur crime news

नागपूर : वर्षाअखेरीस सायबर क्रिमिनल्स सक्रिय झाले आहेत. आता फोन पे आणि गुगल पे वापरणाऱ्यांना त्यांना टार्गेट केले आहे. चक्क गुगल पे हॅक करून सायबर चोर पैसे काढत आहेत. त्यामुळे मोबाईल ॲपवरून ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. नंदनवनमध्ये एका महिलेचा फोन हॅक करून गुगल पे मधून चक्क ८५ हजार रुपये सायबर क्रिमिनलने उडविल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम कपिल शेंडे (२५, रा. दर्शन कॉलनी, नंदनवन) यांनी गुगल पे डाऊनलोड केले आणि वापरही सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गुगल पे वापरला नव्हता. त्यामुळे गुगल पे ॲप बंद पडले. त्यांनी कस्टमर केअरला फोन करून तक्रार केली. १४ डिसेंबरला पूनम यांना एक फोन आला.

‘फोन पे कार्यालयातील कस्टमर केअरमधून बोलत आहे, तुमच्या तक्रारीचे समाधान करण्यासाठी फोन केला आहे’ अशी माहिती दिली. गुगल पे सुरू करण्यासाठी एक लिंक पाठविण्यात आली असून, तुम्ही केवल ती क्लीक करा. तुमचा प्रॉब्लेम सुटून जाईन, अशी माहिती दिली.

पूनम यांनी आलेल्या लिंकवर क्लीक केले. त्यानंतर मोबाईल हॅंग झाला. त्याचा डिस्प्ले गेला आणि पाच मिनिटानंतर फोन पुन्हा सुरू झाला. पूनम यांना लगेच ५९ हजार ९९६ रुपये बॅंक खात्यातून काढल्याचा मॅसेज आला. त्या गोंधळल्या. त्यांना सूचेनासे झाले.

पुन्हा केला फोन

पूनम यांच्या खात्यातून पैसे काढल्याचे कळताच त्यांनी पुन्हा त्याच क्रमांकावर फोन केला. पैसे कट झाल्याची माहिती दिली. आरोपीने एक ॲप्स मोबाईलवर डाऊनलोड करायला सांगितले. पूनम यांनी पैसे परत मिळतील या आशेने ॲप्स डाऊनलोड केले. त्यानंतर २४ हजार ९९९ रुपये खात्यातून काढल्याचा मॅसेज आला. सायबर क्रिमिनल्सने खात्यातून पैसे उडविल्याचे लक्षात येताच त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

ग्राहकांनी सतर्क होणे गरजेचे
ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी मोबाईलमध्ये सुरक्षित ॲप्सची निवड करा. सायबर क्रिमिनल्स लिंक आणि कोणतेही ॲप्स डाऊनलोड करण्यास लावत असतील तर धोका ओळखा. अशावेळी ग्राहकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. जर कुणाचेही पैसे खात्यातून उडविल्यास पोलिसांकडे त्वरित तक्रार करा. तक्रारांची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिस करतील.
- केशव वाघ,
सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com