esakal | गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Two leopards die of shock at patur

गावातील लहान मुले जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले असता दोन बिबटे विद्युत खांबाजवळ दिसून आल्याने लहान मुलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी असलेले शेतकऱ्यांनी लाठ्या काठ्या घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली. 

गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चतारी (जि.अकोला) :  गावातील लहान मुले जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले असता दोन बिबटे विद्युत खांबाजवळ दिसून आल्याने लहान मुलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी असलेले शेतकऱ्यांनी लाठ्या काठ्या घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली. 

मात्र, तेथे एक विचित्र प्रकार समोर आला. दोनही बिबट्यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज एव्हाना गावकऱ्यांना आला होता. ही घटना २३ डिसेंबर रोजीच्या रात्री घडल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तविला आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

आलेगाव वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि मृत्यू झालेल्या बिबटे व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. विद्युत खांब जवळ मुंगूसाचा सुद्धा मृत अवस्थेत आढळून आला. त्यावरून असे स्पष्ट होते की दोन्ही बिबटे मुंगूसचा शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करीत होते. लोखंडी विद्युत खांबाला शॉक लागून मुंगूसचा मृत्यू झाला आहे.

चार महिन्यांपासून बिबट्याची होती दहशत
पिंपळखुटा चांगेफळ परिसरात गेल्या चार ते पाच महिन्यापासून दहशत पसरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. शेतकऱ्यांनी शेतात रात्रीच्या वेळी जाण्याचे टाळले होते. सदर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरातील ग्रामस्थांनी बिबटे पाहण्यासाठी तुंबळ गर्दी केली होती.

हे नक्की पहा- आजच्या ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा

बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभाग अपयश
पिंपळखुटा चांगेफळ परिसरात गेल्या चार महिन्यांमध्ये बिबट्याने रात्रीच्या वेळी अनेक जनावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे. परंतु वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यास यश आले नाही.

हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक

खांबामध्ये अनेक दिवसापासून होता विद्युत प्रवास
पिंपळखुटा परिसरातील नितीन जगन्नाथ खरप यांच्या शेतातील लोखंडी विद्युत खंबामध्ये गेल्या काही दिवसापासून विद्युत प्रवाह सुरू होता. त्याबाबतची माहिती वीज वितरण विभागाला वारंवार देण्यात आली होती. अखेर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन बिबट्याचा मृत्यू झाला.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image