वाहन नोंदणी व परवान्याबद्दल नितीन गडकरींनी दिले महत्त्वाचे निर्देश

nitin gadkari
nitin gadkari

नागपूर : करोना व त्यामुळे केलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांसोबत वाहनांनासुद्धा बसला आहे. याकरिता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसंसची मुदत 31मार्चपर्यंत वैध आहे त्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. सर्वच राज्यांनी या निर्देशाचे पालन करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. खासदार विकास महात्मे, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, महापौर संदीप जोशी, आमदार अनिल सोले, गिरीश व्यास, मोहन मते, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे या वेळी उपस्थित होते.

यावेळी गाड्यांच्या रजिस्ट्रेशनचाही मुद्दा उपस्थित झाला. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच शासकीय कार्यालये बंद ठेववण्यात आले आहेत. कामकाज ठप्प झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 एप्रिलपर्यंत लॉकाऊन जाहीर केले आहे. या दरम्यान ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट तसेच ड्रायव्हिंग लायसंसची मुदत संपत आहे त्याचे काय? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. त्यावर गडकरी यांनी अशा सर्व प्रकरणांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com