तुकाराम मुंढे ऍक्‍शन मोडमध्ये, दुसऱ्याच दिवशी चार कर्मचाऱ्यांना दणका!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

शहराला राहण्यायोग्य व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या दोन गोष्टींवर आपला भर राहणार आहे. चांगले रस्ते, उद्यान, उत्तम वाहतूकसेवा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. या सेवा चांगल्याच राहिल्या पाहिजे. तक्रार निवारण ऍपमध्ये स्वच्छता, आरोग्य व इतर सेवा अशा एकूण 60 ते 70 सेवांचा समावेश केला जाणार आहे.

नागपूर : छोटीछोटी कामे आणि तक्रारींसाठी नागरिकांना महापालिकेच्या मुख्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. याकरिता 31 मार्चपर्यंत तक्रार निवारण ऍप सुरू केला जाईल अशी माहिती महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यापूर्वी दोन महापालिकांमध्ये हा प्रयोग केला, त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - नागपुरच्या डॉनने लावली व्यापाऱ्याच्या डॉक्‍याला पिस्तुल...मग झाले असे

शहराला राहण्यायोग्य व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या दोन गोष्टींवर आपला भर राहणार आहे. चांगले रस्ते, उद्यान, उत्तम वाहतूकसेवा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. या सेवा चांगल्याच राहिल्या पाहिजे. तक्रार निवारण ऍपमध्ये स्वच्छता, आरोग्य व इतर सेवा अशा एकूण 60 ते 70 सेवांचा समावेश केला जाणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून या सेवा घरबसल्या मिळाव्यात, नागरिकांना त्रास होऊ नये हा या मागचा उद्देश आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बघूनच योजना आखल्या जातील. उत्पन्न वाढवतानाच अनावश्‍यक खर्च होणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागेल, असे मुंढे यांनी सांगितले.

वर्क कल्चर तयार करययास प्राधान्य
आपण इतरांपेक्षा वेगळे नाही. यापूर्वीच्या आयुक्तांनी चांगले काम केले. त्यात आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न आहेत. "वर्क कल्चर' तयार करण्यास आपले प्राधान्य आहे. तक्रारी आल्यावर त्या तातडीने सोडवल्या जाव्यात. बघतो, करतो असे यापुढे चालणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

लेखा विभागात झाडाझडती
आयुक्त मुंढे यांनी दुपारी तीनच्या सुमारास लेखा व वित्त विभागाला भेट दिली. प्रवेशद्वारावरच त्यांना सेवानिवृत्त झालेले कर्मचारी डोमाजी बांगडे हे थकीत रकमेसाठी आलेले दिसले. दोन वर्षांपासून कार्यालयात चकरा मारत असून, पैसेच मिळत नसल्याचे त्यांनी मुंढे यांना सांगितले. त्यामुळे मुंढे यांनी विभागातील संबंधित कर्मचाऱ्याला कारण विचारत चांगलेच झापले. साधारणत: अर्धा तास त्यांनी या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. आयुक्त पाहणी करीत असल्याची माहिती मिळाल्यावर टपऱ्यांवर असलेले कर्मचारी धावतपळत कार्यालयात आले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMC becoming a more Technosavy