मंगळागौरीच्या जागरावरही यंदा कोरोनाचे सावट; नवविवाहिता यंदा सासरीच

मनीषा येरखेडे
Wednesday, 5 August 2020

‘नाच गं घुमा कशी मी नाचू...’,’पाट्या बाई पाट्या...’, ‘ चला ग मंगळा गौरीला या गौरीचा कणा’, ही मंगळागौरीची गाणी यंदा ऐकू येत नाहीत. कारण कोरोनामुळे ठरावीक उपस्थितीत हा कार्यक्रम करावा, अशी शासनाची अट आहे. तर दुसरीकडे सून किंवा मुलीचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आप्तेष्ट येऊ शकणार नसतील तर मोठा उत्सव नको, असाही विचार आहे. हे सादरीकरण करणाऱ्या मंडळातील कलावंतांना या वर्षी सराव करणे तर सोडाच पण उत्सवाची तयारी करण्याचीही संधी मिळाली नाही

नागपूर : शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढते आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रणत असलेला कोरोना शिथिलतेनंतर वाढताना दिसतो आहे. यंदा अनेक सण-समारंभ रद्द करावे लागले. कोरोना प्रादुर्भावाचा फटका मंगळागौरीच्या सणाला देखील बसला आहे. विविध खेळ खेळत, नाच, गाणी सादर करत उत्साहात साजरा केला जाणार मंगळागौरीचा सण रद्द झाल्याने अनेक महिलांचा हिरमोड झाला आहे. लॉकडाऊन असल्याने, नवविवाहितांनाही माहेरी जाता न अल्याने, यंदा मंगळागौरीलाही नवविवाहिता सासरीच आहेत.

श्रावण महिन्यापासून व्रतवैकल्ये सुरू होतात. यात सासुरवशीण महिलांसाठी मंगळागौरी हा सर्वात आवडता सण असतो. कोरोनामुळे नवविवाहितांना मंगळागौरीचा सण सार्वजनिक रीत्या साजरा करणे शक्य नाही. दरम्यान नवविवाहिता देखील सासरीच अडकून पडल्या आहे. ‘नाच गं घुमा कशी मी नाचू...’,’पाट्या बाई पाट्या...’, ‘ चला ग मंगळा गौरीला या गौरीचा कणा’, ही मंगळागौरीची गाणी यंदा ऐकू येत नाहीत. कारण कोरोनामुळे ठरावीक उपस्थितीत हा कार्यक्रम करावा, अशी शासनाची अट आहे. तर दुसरीकडे सून किंवा मुलीचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आप्तेष्ट येऊ शकणार नसतील तर मोठा उत्सव नको, असाही विचार आहे. हे सादरीकरण करणाऱ्या मंडळातील कलावंतांना या वर्षी सराव करणे तर सोडाच पण उत्सवाची तयारी करण्याचीही संधी मिळाली नाही.

ऑनलाईन खेळांची नाही मजा
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहे. दरम्यान यावर पर्याय म्हणून अनेक जण ऑनलाईन उपक्रम राबवित आहे. मंगळागौर हा खेळांचा उत्सव असल्याने याची मजा ऑनलाईन नसल्याचे अनेक महिलांचे म्हणणे आहे. दरम्यान नवविवाहितांची पहिली मंगळागौर ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र यंदा हौशीवर पाणी फिरले आहे.

सविस्तर वाचा - आमदार गिरीष व्यास म्हणतात, आजही ताज्या आहेत अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या कारसेवेच्या आठवणी

कोरोनामुळे हिरमोड
आमच्या मंडळातील सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही मंगळागौरीचे कार्यर्कम करतो त्यात खुप मजा येते. सरावाच्या निमीत्ताने सर्वार्ना एकत्र यायला मिळते. श्रावण महिना म्हणजे आमच्यासाठी मजा असते. परंतु कोरोना मुळे काहीही करता आले नाही. कुठल्याही घऱी कायर्क’माचे बोलवणे आले नाही त्यामुळे पुरता हिरमोड झाला आहे.
संगीता भालेराव, भक्ती महिला मंडळ, नागपूर.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No celebration of Mangalagour this year due to corona