नागपूरकरांनो महिनाभर पाणी वापरा जपून; महिनाभर येणार एकदिवसाआड नळ; 'या' वस्त्यांना बसणार फटका 

No tap water available for a month in Nagpur City Latest News
No tap water available for a month in Nagpur City Latest News
Updated on

नागपूर ः पेंच ते गोरेवाडा या दरम्यानच्या मोठ्या जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करावयाची असल्याने सहा जानेवारीपासून तब्बल एक महिना शहराला एकदिवसाआड पाणी मिळणार आहे. याचा फटका प्रामुख्याने पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील वस्त्यांना बसणार आहे.

नवेगाव खैरी येथून २७ किलोमीटर लांबीच्या २३ मी.मी.व्यासाच्या जलवाहिनीतून गोरेवाडा येथे पाणी आणले जाते. येथे पाणी शुद्ध करून शहराला पुरवठा केला जातो. या वाहिनीवर दूरगाव व करंभाड गावाच्या दरम्यान चार ठिकाणी गळती आढळली. आहे. एक गळती मोठी असून दररोज चार ते पाच एमएलडी पाणी वाया जात असल्याचे आढळून आले आहे. ही गळती रोखली नाही तर उन्हाळ्यामध्ये टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याकरिता सुमारे ३० दिवसांचा कालावधी लागणार आहे. प्राथमिक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून ६ जानेवारीपासून या वाहिनीवरून होणारा पुरवठा बंद करावा लागणार आहे.

हिवाळा असल्याने पाण्याचा वापर कमी आहे. पावसाळ्यात कामे करता येत नाही तर उन्हाळ्यामध्ये टंचाईचा सामना करणे कठीण जाते. दुरुस्तीसाठी वाहिनीतील पाणी पूर्णपणे काढावे लागेल. त्यामुळे वाहिनीच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना पिके काढण्यास सांगण्यात आले आहे.

कालव्याने आणणार पाणी

एक दिवसा आठ पाणी पुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाच्या कालव्‍यांद्वारे महादुलापर्यंत पाणी आणले जाईल. हे अंतर ४८ किलोमीटर आहे. येथून उपसा करून गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. कालव्यातून २०० क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. त्यापैकी १५० क्युसेस पाणी नागपूरमध्ये पोहोचेल. कालव्यांच्या वापरासाठी जलसंपदा विभागाने परवानगी दिली आहे.

दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या वस्त्या

गोरेवाडा येथून लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, गांधीबाग तसेच सतरंजीपुरा, आशीनगर, आशीनगर आणि मंगळवारी झोनच्या काही भागांना पाणी पुरवठा केला जातो. या झोन अंतर्गत जवळपास ६५ टक्के वस्त्या येतात. कन्हान नदीवरून पाणी वितरण होणाऱ्या वस्त्यांचा पाणी पुरवठा नियमित राहणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महावितरणला विनंती

जलवाहिनीच्या दुरुस्तीला ३० दिवस लागणार आहे. नागपूरमध्ये कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. महादुला येथून ते उचलले जाणार आहे. त्यामुळे किमान महिनाभर महावितरणने सहकार्य करावे. विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी, असे विनंती पत्र मनपाच्या जलप्रदाय विभागाच्यावतीने महावितरणला पाठवण्यात आले आहे.

गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाणी वाया गेल्यास उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी महिनाभर थोडी कळ सोसावी. पाण्याची नासाडी करू नये.
पिंटू झलके,
सभापती, जलप्रदाय विभाग 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com