
नागपूर : कोरोनासारख्या साथीच्या आजारावर नियंत्रण राखण्याचे तसेच उपचाराची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र ही जबाबदारी मेयो आणि मेडिकल या वैद्यकीय शिक्षण संस्था पेलवत आहेत. महापालिका केवळ जनजागरण आणि आकडे मोड करण्यापलिकडे काही करत नाही. दर दुसरीकडे कोरोनाची स्थिती आता हाताबाहेर गेली असून मेडिकलमध्ये व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत कोरोनाचे रुग्ण आहेत. व्हेंटिलेटर मिळत नसल्यामुळे ॲम्बुबॅगच्या भरोश्यावर रुग्णांचा श्वास सुरू आहे.
मेडिकलमध्ये दर दिवसाला कोरोनाबाधितांसाठी एक किंवा दोन नवीन वॉर्ड तयार करण्यात येत आहेत. एकाच दिवसात ते वॉर्ड हाऊसफुल्ल होत आहेत. मेडिकलमधील ७५ टक्के खाटा या कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येत आहे. नागपुरातील सद्या ६ हजार ७२ खाटा उपलब्ध आहेत. या सर्व खाटा फुल्ल झाल्या आहेत.
खासगी रुग्णालयात साडेतीन हजारावर खाटा आहेत. तर सद्या शहरात खासगी, सरकारी रुग्णालयात ३ हजार ३१२ ऑक्सिजनयुक्त खाटा आहेत. १५२३ अतिदक्षता विभागातील खाटा आहेत. ५१५ व्हेंटिलेटरयुक्त खाटा आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना व्हेंटिलेटर खाट मिळणे आवश्यक आहे. शहरातील आरोग्य सेवाच आता व्हेंटिलेटरवर आली आहे.
मेडिकलमध्ये पाच व्हेंटिलेटर
मेडिकलचे ११३ व्हेंटिलेटर आहेत. मात्र व्हेंटिलेटरची गरज भासणार हे लक्षात येणार असल्यामुळेच मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी देणगीतून पाच व्हेंटिलेटरची सोय केली. ते व्हेंटिलेटर नुकतेच सुरू करण्यात आले. आता मेडिकलमध्ये ११८ व्हेंटिलेटर आहेत. अधिक व्हेंटिलेटरची गरज भासणार असल्याचे सांगण्यात आले.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.