आता नापास नव्हे पुढील परीक्षेसाठी पात्र...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

नागपूर : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे दहावीनंतर आता बारावीच्या गुणपत्रिकेवरून "नापास'चा शेरा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. 20) विभागाने अध्यादेश काढला आहे. त्यामुळे फेब्रुवारी आणि जुलै महिन्यातील परीक्षेच्या निकालात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास गुणपत्रिकेवर "पुढील परीक्षेसाठी पात्र' असा शेरा देण्यात येईल.

बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. या परीक्षेतील यशापयशावर विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याची दिशा ठरत असते. त्यामुळे या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे या दृष्टचक्रातून विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी यापूर्वीच्या सरकारने दहावीच्या गुणपत्रिकेवर "नापास'ऐवजी "पुढील परीक्षेसाठी पात्र' आणि त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना "कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र' असा शेरा दिला होता. यावरूनच सीबीएसईनेही काही दिवसांपूर्वीच गुणपत्रिकेवरील "नापास' शेरा काढण्याचा निर्णय घेतला. आता विभागाने दहावीप्रमाणे बारावीतही हा निर्णय लागू करण्याचे ठरविले आहे.

सविस्तर वाचा - महाशिवरात्रीला भांग पिताना घ्या या सहा गोष्टींची काळजी...अन्यथा भोगावे लागतील परिणाम

मे महिन्यात येणाऱ्या निकालापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या निकालात एक-दोन आणि तीनपेक्षा अधिक विषयांत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला "पुढील परीक्षेसाठी पात्र' तर जुलै-ऑगस्ट परीक्षेच्या निकालात एक-दोन विषयांत अनुत्तीर्ण असल्यास "पुढील परीक्षेसाठी पात्र' आणि त्यापेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना "कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र' असा शेरा देण्यात येईल.

असा असेल शेरा
फेब्रुवारी-मार्च परीक्षा निकाल
सर्व विषयांत उत्तीर्ण- उत्तीर्ण
एक वा दोन विषयांत अनुत्तीर्ण- पुढील परीक्षेसाठी पात्र
तीन वा त्यापेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण- पुढील परीक्षेसाठी पात्र

जुलै-ऑगस्ट परीक्षा निकाल
सर्व विषयात उत्तीर्ण- उत्तीर्ण
एक वा दोन विषयांत अनुत्तीर्ण- पुढील परीक्षेसाठी पात्र
तीन वा त्यापेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण- कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now on 12th result fail word is vanish