esakal | आता जनावरांचेही ‘पशू आधार कार्ड’; जनावरांची माहिती एकाच क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Now the Animal Aadhar Card

जनावरांची टॉग पूर्ण झाल्यानंतर शेळ्या-मेंढ्या आणि बकरी यांचेही आधार कार्ड तयार केले जाणार आहे. या कार्डमध्ये युनिक नंबर, मालकांचा तपशील आणि जनावरांच्या लसीकरण आणि प्रजननाची माहिती असणार आहे. जनावरांची विक्री करतानाही आता आधार कार्डचा नंबर आवश्यक झाला आहे.

आता जनावरांचेही ‘पशू आधार कार्ड’; जनावरांची माहिती एकाच क्लिकवर

sakal_logo
By
अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर) : पशुपालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘ई-गोपाल’ ॲपचे उद्घाटन करण्यात आले. याद्वारे जनावरांचेही आधार कार्ड काढण्यात येत आहे. पशू आधारकार्ड काढण्यासाठी पशुसंवर्धन विभाग पुढे सरसावला आहे. याद्वारे एकाच क्लिकवर जनावरांची माहिती उपलब्ध होणार आहे.

‘ई गोपाल’ ॲपचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. जनावरांचे टॅगिंग हे त्यांचे पशू आधारकार्ड आहे. पशू आधार कार्डच्या माध्यमातून प्रत्येक गाई, म्हशीसाठी एक ओळख क्रमांक दिला जाणार आहे. पशू आधार कार्डमुळे गुरेढोरे साफ्टवेअरवरून घरी बसून जनावरांची माहिती घेण्यास सक्षम ठरणार आहे.

अधिक वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

याशिवाय लसीकरण, जातीसुधार कार्यक्रम, वैद्यकीय सहाय्य यासह इतर कामेही सहज करता येणार आहे. सध्या देशात पशूंची माहिती ठेवण्यासाठी मोठा डाटा तयार केला जात आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

केंद्रीय पशूसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार येणाऱ्या दीड वर्षाच्या काळात जवळपास ५० कोटी गाईंना त्यांचा मालक, त्यांची प्रजाती आणि उत्पादकता शोधण्यासाठी डीजिटल व्यासपीठावर अनोखी आयडी देण्यात येणार आहे. जनावरांच्या कानात आठ ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग ठेवला जाणार आहे. या टॅगवर बारा अंकी आधार क्रमांक छापील राहणार आहे. यासाठी पशूसंवर्धन विभागातर्फे विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

जाणून घ्या - 'शौक के लिये कुछ भी करेगा'

जनावरांची टॉग पूर्ण झाल्यानंतर शेळ्या-मेंढ्या आणि बकरी यांचेही आधार कार्ड तयार केले जाणार आहे. या कार्डमध्ये युनिक नंबर, मालकांचा तपशील आणि जनावरांच्या लसीकरण आणि प्रजननाची माहिती असणार आहे. जनावरांची विक्री करतानाही आता आधार कार्डचा नंबर आवश्यक झाला आहे. एखाद्या जनावराचा नैसर्गिक आपत्ती दरम्यान मृत्यू झाल्यास त्याला आधार कार्ड असल्यास शासकीय नुकसान भरपाई मिळणार आहे.

पशूसंवर्धन विभागाकडे नोंद

हिंगणा तालुक्यात गायी ३८,५०३, म्हशी १०,१६०, मेंढ्या ४२९, शेळ्या २३,१८२, डुक्करं १४४ ही आकडेवारी पशूसंवर्धन विभागाकडे नोंद करण्यात आली आहे. पशू आधारकार्डचे काम पशूसंवर्धन विभागातर्फे सर्व ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. सर्व पशूपालकांनी तातडीने पशूंचे आधार कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन पशूसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

लसीकरण मोहीम सुरू
राष्ट्रीय पशूधन रोग प्रतिबंध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. हिंगणा तालुक्यातही या कार्यक्रमाअंतर्गत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. घोडेघाट येथे जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुडलीक यांनी शिबिरास भेट दिली. या लसीकरण मोहिमेचा लाभ सर्व पशूपालकांनी घ्यावा. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पशू आधारकार्ड तयार करण्यासाठी पशूपालकांनी पशूसंवर्धन विभागाशी तातडीने संपर्क साधावा.
- डॉ. ऋचा लांजेवार,
पशूधन विकास अधिकारी (विस्तार), हिंगणा

संपादन - नीलेश डाखोरे

go to top