कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

अनिल कांबळे
Sunday, 1 November 2020

शनिवारी सकाळी मैत्रिनीने अक्षयच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्याने प्रतिसाद दिला नाही. मैत्रिन हॉटेलमध्ये आली. व्यवस्थापकाला माहिती दिली. व्यवस्थापकानेही अक्षयच्या मोबाइलवर संपर्क साधला. प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती अक्षयच्या खोलीसमोर गेली. तिने दरवाजा ठोठावला तरीही अक्षय प्रतिसाद देत नव्हता.

नागपूर : ‘तू मला आत्ताच भेटायला ये... मला एकदा तुला भेटायचे... मी कर्जामुळे त्रस्त झालो आहे...’ असे युवकाने मैत्रिनीला फोन करून म्हटले. त्यावर मैत्रिनीने ‘आज भेटणे शक्य नसून उद्या येईल...’ असे सांगत फोन कट केला. मात्र, युवकाने उद्याची वाट न पाहता रात्रीच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी बेलतरोडीतील ओयो हॉटेलमध्ये उघडकीस आली. अक्षय चव्हाण (वय २६ रा. मोहाडी ता. कुही) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिक्षणानिमित्त नागपुरात राहायला आला होता. तो सोलर कंपनीत काम करीत होता. त्याच्यावर कर्ज झाले. तो दोन दिवसांपूर्वी बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेलमध्ये आला. शुक्रवारी रात्री आठ वाजता त्याने मैत्रिनीच्या मोबाइलवर संपर्क साधला. तिला भेटायला हॉटेलमध्ये बोलाविले. त्यावर शनिवारी सकाळी येतो, असे ती त्याला म्हणाली. त्यानंतर अक्षय याने हॉटेलमध्ये जेवण केले आणि पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा - प्रेमप्रकरणातून झाले भांडण अन् युवकाने उचलले हे पाऊल

शनिवारी सकाळी मैत्रिनीने अक्षयच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्याने प्रतिसाद दिला नाही. मैत्रिन हॉटेलमध्ये आली. व्यवस्थापकाला माहिती दिली. व्यवस्थापकानेही अक्षयच्या मोबाइलवर संपर्क साधला. प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती अक्षयच्या खोलीसमोर गेली. तिने दरवाजा ठोठावला तरीही अक्षय प्रतिसाद देत नव्हता. तिने दार लोटले असता तिला अक्षयने गळफास लावलेला दिसला. कर्जबाजारी झाल्याने अक्षय याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man commits suicide due to debt