आता शेतकऱ्यांसाठी कामठी बाजार समितीचेही दरवाजे बंद

 कामठी ः बाजार समितीचे भाजीपाला विक्री मार्केट.
कामठी ः बाजार समितीचे भाजीपाला विक्री मार्केट.
Updated on

कामठी (जि.नागपूर) : शहरात कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्यानंतर संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. कामठी शहरातील काहींनी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले. त्याचा फटका आता शेतकरी बांधवांसह हजारो नागरिकांना कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीबाजार बंद झाल्याने बसणार आहे. कामठी शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याची घटना पुढे आली. परिणामी कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीने बुधवारपासून (ता.15) भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अन्य बाजारात विकावा लागेल माल
शेतकऱ्यांना त्रास होऊ नये आणि त्यांचा माल पूर्णपणे खपावा म्हणून सभापती हुकूमचंद आमधरे यांच्या नेतृत्वात कार्य सुरू होते. मात्र, अचानक कामठी शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव असलेला रुग्ण आढळून आला असल्याने हा गंभीर प्रकार लक्षात घेता अडतियांनी यावर चिंता व्यक्त करीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनोचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी काळजी म्हणून भाजीमार्केट बंद करण्याची मागणी केली. त्यानुसार बुधवारपासून बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कामठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी आणू नये. मात्र, शेतकऱ्यांनी स्वतःचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार योग्य त्या बाजारात कृषी माल विकावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कामठी आणि शेजारी परिसरातील शेतकऱ्यांना आता कामठीशिवाय अन्य बाजारात शेतीमाल विकावा लागणार आहे.

बाजार बंद करण्याचा निर्णय
या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनसामान्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे आवश्‍यक आहे. कामठीकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकांची वर्दळ लक्षात घेता कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याने भाजीबाजार बंद
करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हुकूमचंद आमधरे
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कामठी  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com