अब होगा सब कुछ ऑल वेल, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणाले हे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांचे नेतृत्वात संघटनेचे शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आश्‍वासन दिले. त्यात पोलिस विभागाच्या धर्तीवर वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पाच टक्के शासन सेवेत आरक्षण देणे, वनशहीद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देणे, वृत्तस्तरावर व विभागीय स्तरावर वनशहीद स्मारक उभारणे, वनरक्षक वनपालांना अतिरिक्त कामाचा कर्तव्यभत्ता देणे, आहार भत्ता देणे, संप कालावधी हा कर्तव्य कालावधी गृहीत धरून संप कालावधीतील वेतन काढणे

नागपूर :  वनरक्षक व वनपाल यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील आणि समस्या सोडविण्यात येईल असे आश्‍वासन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक( प्रशासन व दुय्यम संवर्ग) विकास गुप्ता यांनी आज दिले.

महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांचे नेतृत्वात संघटनेचे शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आश्‍वासन दिले. त्यात पोलिस विभागाच्या धर्तीवर वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पाच टक्के शासन सेवेत आरक्षण देणे, वनशहीद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देणे, वृत्तस्तरावर व विभागीय स्तरावर वनशहीद स्मारक उभारणे, वनरक्षक वनपालांना अतिरिक्त कामाचा कर्तव्यभत्ता देणे, आहार भत्ता देणे, संप कालावधी हा कर्तव्य कालावधी गृहीत धरून संप कालावधीतील वेतन काढणे, वनरक्षक व वनपालांना गस्तीकरिता मोटार सायकलचा पुरवठा करणे, वन्यजीव विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर पदाचे वेतनश्रेणी देणे, कर्मचाऱ्यांच्या बदली सत्रात समुपदेशनाद्वारे बदली धोरण राबविणे, वनरक्षक पदावरून वनपाल पदावर पदोन्नतीमध्ये एकसूत्रता आणणे. आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करणे, क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना कॅशलेस हॉस्पिटल योजनेचे लाभ मिळावा, चुकीच्या वेतन निश्‍चितीमुळे अतिप्रदान करण्यात आलेली रकमेची वसुली न करणे, पोलिस विभागाप्रमाणे वनसेवा स्पर्धा परीक्षेत वनरक्षक व वनपाल यांना संधी देणे, सरळसेवा व पदोन्नतीची बिंदुनामावली अद्ययावत करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, वनरक्षक व वनपालांना ओळखपत्र देणे, सेवापुस्तक अद्ययावत करून दुयम प्रत पुरविणे आदी विषयांवर चर्चा करून संबंधितांना सूचना देणे व शासनस्तरावर पाठपुरावा करणेबाबत या विषयावर चर्चा करण्यात आली.

ब्रेकिंग - पती-पत्नीने घेतले विष आणि...

या बैठकीला वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष माधव मानमोडे, केंद्रीय उपाध्यक्ष विशाल मंत्रीवार, अरुण पेंदोरकर, शिवसांब घोडके, भारत गडावी, लहुकांत काकडे, विजय रामटेके, अशोक गेडाम, संतोष जाधव, एस. बी. पुंड, ईश्वर मांडवकर, मनीष निगकर, मारोती पुल्लेवाड, ए. डी. तागड उपस्थित होते.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now everything will be all well