तुमच्याही घरावर आहे ना मुलीच्या नावाची पाटी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

एक जानेवारी 2020 पासून जन्म झालेल्या मुलींच्या नावाची पाटी लावण्यात येत आहे. समाजात विशेष करून ग्रामीण भागात घराला पुरुषांच्या नावाची पाटी लावून पुरुषांची ओळख देण्यात येते. मात्र, या पारंपरिकतेला महिला व बालकल्याण विभागाने फाटा देत मुली व महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपूर : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी तिच्याबाबत सन्मानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे "बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रम राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागात ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभाग करीत आहे. याचाच एक भाग म्हणून घरावर मुलींच्याच नावाची पाटी लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

सविस्तर वाचा - पोलिस अधिकाऱ्यांची चलाखी, आवडीच्या ठिकाणी होतात उशिरा रुजू
एक जानेवारी 2020 पासून जन्म झालेल्या मुलींच्या नावाची पाटी लावण्यात येत आहे. समाजात विशेष करून ग्रामीण भागात घराला पुरुषांच्या नावाची पाटी लावून पुरुषांची ओळख देण्यात येते. मात्र, या पारंपरिकतेला महिला व बालकल्याण विभागाने फाटा देत मुली व महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींचा जन्मदर व शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी "बेटी बचाओ, बेटी पढाओ' या घोषवाक्‍यांतर्गत केंद्र सरकारकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने 20 ते 26 जानेवारीदरम्यान "बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा सप्ताह साजरा केला. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात ज्या घरी 1 जानेवारी 2020 नंतर मुलीचा जन्म झाला. त्यांच्या घरी बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी जाऊन तिच्या नावाची पाटी लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मुलीच्या पालकांना मार्गदर्शन करून पाटी लावण्यामागची भूमिका पटवून सांगितली जात आहे. जन्मलेल्या मुलींच्या नावाने पाटी लावल्याने त्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त केला.
या अभियानांतर्गत ग्रामीण भागात जन्म झालेल्या मुलींच्या नावाने तिच्या घरी अथवा परिसरात तिच्या नावाने एक वृक्षसुद्धा लावण्यात आले. त्याचबरोबर माता आणि मुलीचा ग्रामस्तरावर सत्कारसुद्धा करण्यात आला.

मुलींचा सन्मान आवश्‍यक
मुलींचा सन्मान होणे आवश्‍यक आहे. यासाठीच हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. 2011 च्या जनगणनेच्या तुलनेत सध्या 971 मुलींचा जन्मदर झाला.
भागवत तांबे, महिला व बालकल्याण अधिकारी, जि. प.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now girls name on home