धक्कादायक! मेडिकलने काढला अजब फतवा; नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार? 

केवल जीवनतारे
Saturday, 3 October 2020

आता तुम्हीच सांगा, नॉनक्लिनिकल डॉक्टर कोरोनाच्या रुग्णांवर कोणते उपचार करणार. कोरोना रुग्णांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार मेडिकलमध्ये सुरू आहे. विशेष असे की, ही व्यथा शरीररचना, शरीरक्रिया आणि जीव रसायन, न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉक्टरांची आहे.

नागपूर :  वीस वर्षांपासून ते डॉक्टरांची भावी पिढी घडवत आहेत. एमबीबीएसपासून तर एमडीच्या विद्यार्थ्यांनी शिकवत आहेत. केवळ शिकवणं हाच त्यांचा धर्म बनला आहे. वीस वर्षांपासून त्यांच्या हातातून स्टेथोस्कोप सुटला. मात्र कोविड आजाराचा थैमान सुरू झाले आणि मेडिकलमधील ड्यूटी लावणाऱ्या विभागाने चक्क नॉनक्लिनिकल डॉक्टरांना कोविड वॉर्डात रुग्णसेवा देण्याची सक्ती करण्यात येत आहे. 

आता तुम्हीच सांगा, नॉनक्लिनिकल डॉक्टर कोरोनाच्या रुग्णांवर कोणते उपचार करणार. कोरोना रुग्णांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार मेडिकलमध्ये सुरू आहे. विशेष असे की, ही व्यथा शरीररचना, शरीरक्रिया आणि जीव रसायन, न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉक्टरांची आहे.

अधिक वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

कोरोनाच्या संकटकालात मेडिकलच नव्हेतर सर्व वैद्यक क्षेत्रात मनुष्यबळाचा प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे आयसीएमआरसारख्या संघटनेने नॉनक्लिनिकल डॉक्टरांना समन्वय साधण्यासोबतच प्रशासकीय कामात मदत करण्यासाठी पुढे यावे असे निकष लावून काम या डॉक्टरांना काम देण्यात यावे अशी सूचना केली. विशेष असे की, नॉन क्लिनिकल डॉक्टरांना नॉन कोविड वॉर्डात देण्याचे सोडून थेट कोविड वॉर्डात काम देण्यच्या सूचना जारी केल्या आहेत. 

यामुळे नॉन क्लिनिकल डॉक्टरांच्या हाती कोविड रुग्णांचा जीव आला आहे. अॅनॉटॉमी, फिजिऑलॉजी, बायो केमेस्ट्री, फॉरेनिस्क विभागातील डॉक्टरांना कोरोनावर उपचार करण्याचे मोठे आव्हान ठरत आहे. एका जागरुक रुग्णाच्या नातेवाईकाला ही माहिती कळली, त्या रुग्णाच्या नातेवाईकाने आक्षेपही घेतला, या नॉनक्लिनिकल डॉक्टरांच्या हातून उपचारादरम्यानजीव गेला तर जबाबदार कोण? असा सवाल केला आहे. यासंदर्भात मेडिकल प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

समन्वयासह प्रशासकीय कामे द्या

एका नॉन क्लिनिकल डॉक्टरशी संपर्क साधला असता, त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी घडवण्यासाठी इमाने इतबारे आम्ही वैद्यकीय शिक्षक म्हणून सेवा देत आहोत. एमबीबीएस, एमडीसह बीपीएमटीसह नर्सिंग व इतरही अभ्यासक्रमाच्या वैद्यकीय शाखेशी संबधित विद्यार्थ्यांना त्या विषयातील ज्ञान देणे हे काम करीत आहोत. विशेष असे की, नॉन कोविड वॉर्डातही सेवा देता येऊ शकते, परंतु औषध नसलेल्या कोरोनासारख्या आजारावरील रुग्णांच्या वॉर्डात कोणती सेवा आम्ही देणार. विचार न करता प्रशासनाने थेट आदेश काढले आहेत. 

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर

बरे वाईट झाल्यास जबाबदारी...

आम्ही सेवा देऊ, परंतु काही बरे वाईट झाल्यानंतर आदेश काढणाऱ्यांवर ही जबाबदारी असेल असेही त्यांनी नाव न सांगण्याच्या अटिवर बोलून दाखवले. आयसीएमआरच्या निकषाप्रमाणे समन्वयासह प्रशासकीय कामे करण्याची नव्हेतर नॉन कोविड वॉर्डात सेवा देण्याची तयारी आहे, असल्याचेही ते म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now lecturers of other medical fields will treat corona patients at GMC