आता पदव्यांसाठीही वाट्टेल ते...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सुनील मिश्रा यांनी उन्हाळी 1996 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून "प्रवास व पर्यटन' विषयात पदविका तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर जनसंवाद ही पदवी घेतली. यासाठी मिश्रा यांनी नागपूर विद्यापीठातून स्थानांतर प्रमाणपत्रही प्राप्त केले नव्हते, अशी तक्रार एनएसयूआय नागपूर जिल्हाध्यक्ष आशीष मंडपे यांनी नागपूर विद्यापीठाकडे करीत चौकशी करण्याची मागणी केली होती.

नागपूर : सुनील मिश्रा यांनी उन्हाळी 1996 शैक्षणिक वर्षात गैरमार्गाने दोन पदव्या घेत दोन विद्यापीठांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर तक्रार दाखल करण्याची शिफारस सेवानिवृत्त न्यायाधीश टी. जी. बनसोड यांच्या चौकशी समितीने फेबुवारी 2019 मध्ये केली. या शिफारशीचा आधार घेत, कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी परीक्षा व मूल्यांकन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध तक्रार करण्याच्या सूचना दिली.

हे वाचाच - अबब तब्बल एक लाख १५ हजारांचा आकडा

सुनील मिश्रा यांनी उन्हाळी 1996 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून "प्रवास व पर्यटन' विषयात पदविका तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर जनसंवाद ही पदवी घेतली. यासाठी मिश्रा यांनी नागपूर विद्यापीठातून स्थानांतर प्रमाणपत्रही प्राप्त केले नव्हते, अशी तक्रार एनएसयूआय नागपूर जिल्हाध्यक्ष आशीष मंडपे यांनी नागपूर विद्यापीठाकडे करीत चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची दखल घेत कुलगुरूंनी सेवानिवृत्त न्यायाधीश टी. जी. बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठित केली होती. या समितीने याबाबत चौकशी करून 20 फेब्रुवारी 2019 रोजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना अहवाल सादर केला. अहवालानुसार सुनील मिश्रा यांनी सदर पदवी गैरमार्गाने प्राप्त करून दोन्ही विद्यापीठाची फसवणूक केल्याने भादंवि कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा होत असल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्याची शिफारस समितीने अहवालात केली होती.

तसेच याबाबतची सूचना औरंगाबाद विद्यापीठालाही दिली होती. चौकशी समितीच्या अहवालास नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने 3 जून 2019 रोजी सर्वानुमते स्विकृती प्रदान करून अहवालातील शिफारशीनुसार कार्यवाही करावी असे निर्देशित केले होते. त्यावर राज्यपाल कार्यालयाने 2 जानेवारी रोजी पत्र पाठवित टी. जी. बनसोड यांच्या अहवालानुसार कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत.

दबाव कुणाचा

डॉ. प्रफुल्ल साबळे हे परीक्षा व मूल्यांकन संचालक म्हणून सप्टेंबरला रुजू झाले. मात्र, कुलगुरूंकडून वेळोवेळी सूचना देऊनही डॉ. साबळेंनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही, अशी तक्रार आशीष मंडपे यांनी राज्यपाल व कुलपतींना केली होती. त्यावर राज्यपाल कार्यालयाने जानेवारी रोजी पत्र पाठवित टी. जी. बनसोड यांच्या अहवालानुसार कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे डॉ. साबळे कुणाच्या दबावात आहेत अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now for those who want a degree ...