आता कोरोना रुग्णांना मिळणार 'श्वास'; संस्थांचा पुढाकार; नागपूर निड टू ब्रेथ' अभियान सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Now ventilators will provide by NGO in nagpur

देशात गेल्या तीन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या ५५ कोटींवर गेली आहे. राज्याचा त्यात ३७ टक्के वाटा आहे. शिवाय शहरासह राज्यात मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहेत.

आता कोरोना रुग्णांना मिळणार 'श्वास'; संस्थांचा पुढाकार; नागपूर निड टू ब्रेथ' अभियान सुरू

नागपूर : नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. त्यावर पर्याय म्हणून 'हाय फ्लो नोझल कॅनूला' ची गरज आहे. या उपकरणासाठी शहरातील १३० स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनी 'नागपूर निड टू ब्रेथ' अभियानास सुरुवात केली आहे. या अभियानाद्वारे आलेल्या निधीतून किमान ५० उपकरणांची खरेदी करण्यात येणार आहे. यानंतर ती उपकरणे शासकीय रुग्णालयांना देण्यात येणार आहे.

नक्की वाचा - तुकाराम मुंढे जाताच अधिकाऱ्यांवरच धाक संपला; बदल्यांमध्ये मनपाचे ‘फॅमिली प्लॅनिंग'

देशात गेल्या तीन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या ५५ कोटींवर गेली आहे. राज्याचा त्यात ३७ टक्के वाटा आहे. शिवाय शहरासह राज्यात मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरात आतापर्यंत २ हजार ३०२ मृत्यू झाले आहे. कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून त्यासाठी लागणारे व्हेंटिलेटर्सची संख्या कमी आहे. त्यामुळे रुग्णांची परिस्थिती वाईट होत असते. 

त्यामुळे किडनी आणि फुफ्फुसावर परिणाम होतो. यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यावर 'हाय फ्लो नोझल कॅनूला' परिणामकारक ठरत असून ते रुग्णालयात असल्यास अधिक रुग्णांना वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करता येणे शक्य आहे. याचा विचार करून ‘टु-गेदर वुई कॅन' या संघटनेतील १३० स्वयंसेवी संस्थांनी करीत, या मदत करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. 

विशेष म्हणजे ५० उपकरणाचा खर्च जवळपास ७५ लाखाचा असून त्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची विनंती ही संस्थांकडून करण्यात आली आहे.

शहरात व्हेंटीलेटरची कमतरता असल्याने रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 'हाय फ्लो नोझल कॅनूला' उपकरणाचा वापर केल्यास हाय प्रेशरने ऑक्सिजनचा शरीरात पुरवठा करता येणे शक्य होते. या उपकरणाच्या वापराने रुग्णांना व्हेंटीलेटरच्या स्टेजपर्यंत जाणे टाळता येणे शक्य आहे.
-अक्षिता व्यास, 
स्वंयसेवक, ‘टुगेदर वुई कॅन'

जाणून घ्या - कोरोनाबळींच्या अंत्यसंस्कारासाठी शुल्क वसुली, नातेवाईकांची ऐनवेळी पैशासाठी धावाधाव

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 'हाय फ्लो नोझल कॅनूला' परिणामकारक आहे. या उपकरणाच्या वापराने रुग्णांना व्हेंटीलेटरच्या स्टेजपर्यंत जाणे टाळता येते.
-डॉ. वाय. एस. देशपांडे, 
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, आयएमए. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top