परीक्षा देणाऱ्यांसाठी सीबीएसईने घेतला वेगळा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या परीक्षेच्या धोरणात बदल करण्याचे ठरविले आहे. यापूर्वीच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एकीकडे "होम सेंटर' म्हणजेच विद्यार्थ्यांच्या शाळा देण्याचा निर्णय घेण्यात आला असताना, आता विद्यार्थ्यांना सुविधेनुसार परीक्षा केंद्रासाठी शहर बदलण्याचीही मुभा सीबीएसईकडून देण्यात आलेली आहे.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या काही विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही विषयांच्या परीक्षा आता होणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सीबीएसईने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या परीक्षेच्या धोरणात बदल करण्याचे ठरविले आहे. यापूर्वीच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एकीकडे "होम सेंटर' म्हणजेच विद्यार्थ्यांच्या शाळा देण्याचा निर्णय घेण्यात आला असताना, आता विद्यार्थ्यांना सुविधेनुसार परीक्षा केंद्रासाठी शहर बदलण्याचीही मुभा सीबीएसईकडून देण्यात आलेली आहे.

वाचा - आयुक्त तुकाराम मुंढेंचे नाही म्हणजे नाहीच... वाचा सविस्तर

संपूर्ण देशात 1 ते 15 जुलै दरम्यान बारावी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रात बदल करण्याची मुभा देण्यात आली होती. आता या सुविधेनुसार शहर बदलता येणे शक्‍य होणार आहे. सीबीएसईच्या निर्णयामुळे आता बारावीसाठी शहरात केंद्रांची संख्या दुप्पट होणार आहे. गेल्यावर्षी केवळ दहा केंद्रांचा समावेश होता. आता जवळपास वीस केंद्रांवर तीन हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, हे करताना शहरात कोरोनामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रातील शाळांचा समावेश राहणार नाही.

आणखी वाचा - खंडणी देण्यास विरोध केला म्हणून झाला "त्याचा' गेम

पालकांवर जबाबदारी
तीन हजारावर विद्यार्थी परीक्षा देणार असून बिजनेस स्टडीज, जियोग्राफ्री, हिंदी इलेक्‍टिव, हिंदी कोर, होमसायन्स, समाजशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स-(जुने) कॉम्प्युटर सायन्स (नवीन), इन्फॉरमेशन प्रॅक्‍टिस-(जुने), इनफॉर्मेशन प्रॅक्‍टिस-(नवी), इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी, बायोटेक्‍नॉलॉजी या विषयांच्या पेपरचा समावेश आहे. यासाठी सीबीएसईने पालकांनीच विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत. शाळांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी उपाययोजना करायच्या आहेत.
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now you can change the city with center for CBSE exam