काही सेकंदात ओळखा तुमच्या अन्नातील भेसळ; हे उपाय करून बघाच

अथर्व महांकाळ
Monday, 14 September 2020

आजकालच्या जगात प्रत्येक अन्नपदार्थ भेसळयुक्त आहे. अगदी गायीच्या दुधापासून तर पालेभाज्यांपर्यंत प्रत्येक पदार्थात, धान्यात भेसळ आहे. ज्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक क्षमता कमी होत चालली आहे.

नागपूर : गेल्या ६ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र या आजारापासून दूर राहायचे असेल तर योग्य आणि संतुलित आहार घेण्याची गरज आहे असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पण आजकालच्या जगात प्रत्येक अन्नपदार्थ भेसळयुक्त आहे. अगदी गायीच्या दुधापासून तर पालेभाज्यांपर्यंत प्रत्येक पदार्थात, धान्यात भेसळ आहे. ज्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक क्षमता कमी होत चालली आहे. मात्र आता चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अन्नातील भेसळ कशी ओळखाल याबद्दलची माहिती देणार आहोत. 

क्लिक करा - 'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित

अशी ओळख तुमच्या अन्नातील भेसळ- 

डाळ (हरभरा, तूर) 

मेटॅनील यलो सारखे रंग यात मिसळले जातात. त्यामुळे रंगयुक्त डाळ ओळखायची असेल तर थोडी डाळ पाण्यात टाकून त्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास त्यामध्ये मेटॅनील यलो रंगाची भेसळ आहे, हे लक्षात येते.   

चहा पावडर 

वापरलेली चहा पावडर रंग देऊन मिसळणे, लाकडाचा भुसा, रंगीत पावडर वापरणे अशी भेसळ यात होते. त्यामुळे चहा पावडर थंड पाण्यात घातल्यानंतर रंग सोडते किंवा ओल्या पांढर्‍या कागदावर टाकल्यास कागदावर गुलाबी व लाल रंगाचे ठिपके दिसतात.

मिठाई

मिठाईत भेसळ करण्यासाठी मेटॅनील यलो रंग मिसळलं जातो. तपासण्यासाठी मिठाईचा तुकडा घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास मिठाईत मेटॅनील यलो रंगाची भेसळ असल्याचे समाजावे.

दूध

दुधात पाणी मिसळणे, स्निग्धता काढून घेणे, धुण्याचा सोडा टाकणे असे प्रकार घडतात. त्यामुळे तपासण्यासाठी दुधात बोट बुडवल्यानंतर दूध बोटाला चिकटले नाही, तर स्निग्धता नाही असे समजा.

लाल तिखट

तिखटात विटेचा चुरा घालण्यात येतो. चमचाभर लाल तिखट पाण्यात घातले तर पाणी रंगीत होते.

पिठी साखर

पिठी साखर म्हणून वॉशिंग सोडा मिसळण्यात येतो. हे तपासण्यासाठी पाण्यात विरघळल्यानंतर लिटमस चाचणी केल्यास लाल लिटमस निळा होतो.

खाद्यतेल

खनिज तेल खाद्यतेलात मिसळतात. हे तपासण्यासाठी  एका परीक्षानळीत अंदाजे पाच मिलीमीटर तेल घेऊन त्यामध्ये अल्कोहोल पोटॅशियम हायड्रोऑक्साइड घालून ते उकळत्या पाण्यात पाच मिनिटे हलवा. खाद्य तेलामध्ये खनिज तेल नसल्यास ते त्यात विरघळते. खनिज तेल असल्यास त्याचे दोन थर तयार होतात.

हेही वाचा - कंगणाला मिळालेली Y+ सुरक्षा असते तरी काय? Z+, Z, Y आणि X श्रेणीची सुरक्षा कुणाला कधी मिळते? वाचा

मध

अनेकदा मध म्हणून गुळाचे पाणी दिले जाते. हे तपासण्यासाठी कापसाची वात मधात भिजवून पेटवली आणि मधात भेसळ असेल तर वात तडतडते.

रवा

अनेकदा रव्यात लोखंडाचा चुरा मिसळला जातो. त्यासाठी रव्यावरून चुंबक फिरवावे.

मटार फ्रोजन

मटार पाण्यात घालावेत. थोड्या वेळानंतर पाणी रंगीत होईल असे झाल्यास भेसळ आहे असे समजावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now you can identify Counterfeiting in food at home read full story