कंगणाला मिळालेली Y+ सुरक्षा असते तरी काय? Z+, Z, Y आणि X श्रेणीची सुरक्षा कुणाला कधी मिळते? वाचा

know detail information about Z plus Y plus and other securities read full story
know detail information about Z plus Y plus and other securities read full story

नागपूर : सध्या देशात दोनच विषय चर्चेला जात आहे. एक म्हणजे कोरोना आणि दुसरा म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण. सुशांतची आत्महत्या आणि ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला तुरुंगाची हवा खा लागत आहे. कंगणा राणावतने या प्रकरणात उडी घेतल्याने तिच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. तिला मुंबईत न परतण्याचा सल्लाही राजकीय नेत्यांकडून देण्यात आला होता. हा वाद वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकारने तिला ‘वाय प्लस’ सुरक्षा प्रदान केली. यावरूही चांगलाच वाद निर्माण झाला. चला तर जाणूव घेऊया काय आहे झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स श्रेणीची सुरक्षा आणि याचे काय आहे वैशिष्ट...

आपल्या देशात पोलिस नागरिक, मोठ मोठे नेते, व्यावसायिक, अभिनेते आदींना सुरक्षा प्रदान केली जाते. नेत्यांची प्रसिद्धी किंवा जिवाचा धोका असल्यास कोणती सुरक्षा द्यायची याचा निर्णय सरकार घेत असते. धोका पाहून वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. राजकीय नेता किंवा विशिष्ट व्यक्तीला व्हीआयपी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय धोका पाहून घेतला जातो. गुप्तचर विभागांनी धोक्याचे मूल्यांकन केल्यानंतर संबंधित व्यक्तीला कोणत्या प्रकारचे सुरक्षा प्रदान करायची याचा निर्णय घेतला जातो.

भारतातील सुरक्षा व्यवस्था झेड प्लस, झेड, वाय, आणि एक्स या चार विभागांमध्ये विभागलेली आहे. खासदार, आमदार, नोकरशहा, माजी नोकरशहा, न्यायाधीश, माजी न्यायाधीश, व्यापारी, क्रिकेटपटू, चित्रपट आभिनेते, संत, कधीकधी सामान्य व्यक्तींना या सुरक्षेचा लाभ घेता येतो. व्हीआयपी लोकांच्या जिवाला धोका असेल तर सुरक्षा देणे ही सरकारची जबाबदारी आहे.

ज्या व्यक्तीला धमकी दिली गेली आहे, अशा व्यक्तीने त्याच्या निवासस्थानाजवळील पोलिस ठाण्यामध्ये अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. यानंतर त्या व्यक्तीला कुणाकडून कोणता धोका आहे हे शोधण्यासाठी प्रकरण गुप्तचर यंत्रणांकडे पाठवले जाते. धमकीची पुष्टी केल्यानंतर गृहसचिव, महासंचालक आणि राज्यातील मुख्य सचिव यांचा समावेश असलेली समिती त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची सुरक्षा द्यायची हे ठरवते. यानंतर त्या व्यक्तीचा तपशील औपचारिक मान्यतेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला जातो.

जर एखाद्या व्यक्तीस ‘झेड प्लस’ श्रेणी सुरक्षेचा हक्क असेल तर त्याला किंवा तिला देशभर सुरक्षा मिळेल? यासाठी एक यंत्रणा आहे. तो व्याक्ती ज्या राज्यात जातो त्या राज्याची जबाबदारी सुरक्षा पुरवण्याची असते. परंतु, यासाठी व्हीआयपीला राज्याच्या दौऱ्याची पूर्व माहिती द्यानी लागते. अशा प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेचा कधीही पर्दाफाश होत नाही.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी झालेल्या वादानंतर गृह मंत्रालयाने (एमएचए) सीआरपीएफ सुरक्षेचा वाय-प्लस कॅटेगरी दिला आहे. कंगणाचे संरक्षण करण्याचे काम अकरा कमांडोवर सोपविण्यात आले आहे. दोन कमांडो तिला मोबाईल सुरक्षा पुरवतील तर एक देशभरात तिच्या निवासस्थानाचे पहारेकरी असेल.

सुरक्षा संस्था सुरक्षा कशी पुरवतात

एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप), एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड), आयटीबीपी (इंडो-तिबेट सीमा पोलिस) आणि सीआरपीएफ (सेंट्रल रिझर्व पोलिस फोर्स. ‘एनएसजी’ व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींना ‘झेड प्लस’ श्रेणी सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवते. अनेक एनएसजी कमांडो विशेष संरक्षण समूह (एसपीजी) अंतर्गत पंतप्रधानांचे संरक्षण करतात. एनएसजी देशातील सर्वात प्रगत सुरक्षा शक्ती आहे. जी उच्च धोका असलेल्या व्यक्तीस संरक्षण प्रदान करते.

‘झेड+’ सुरक्षा कव्हर काय आहे?

  • झेड+ ही भारतातील सर्वोच्च श्रेणीची सुरक्षा आहे.
  • हे १० + एनएसजी कमांडोज + पोलिस कर्मचाऱ्यांसह ५५ जवानांचे सुरक्षा कवच देते.
  • प्रत्येक कमांडो मार्शल आर्ट्स आणि सशस्त्र लढाऊ तज्ञ आहे.
  • अत्याधुनिक एमपी ५ गन आणि आधुनिक संप्रेषण गॅझेटसह सुसज्ज एनएसजी कमांडोजद्वारे झेड+ सुरक्षा प्रदान केली गेली आहे.
  • देशातील केवळ १०-१५ व्हीआयपींना झेड+ सुरक्षा प्रदान केली जाते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर काही जणांचा समावेश आहे.

‘झेड’ श्रेणी सुरक्षा

  • ही सुरक्षिततेची दुसरी पातळी आहे.
  • झेड प्रकारात ४ किंवा ५ एनएसजी कमांडोज + पोलिस कर्मचाऱ्यांच्या २२ जवानांचे सुरक्षा कवच असते.
  • दिल्ली पोलिस किंवा आयटीबीपी किंवा सीआरपीएफच्या जवानांनी एक एस्कॉर्ट कार सोबत असते.
  • योग गुरु रामदेव आणि अनेक कलाकारांना झेड सुरक्षा प्रदान केली जाते.

‘वाय’ श्रेणी सुरक्षा

  • सुरक्षेचा हा तिसरा स्तर आहे.
  • वाय प्रकारात १ किंवा २ कमांडो + पोलिस कर्मचाऱ्यांसह ११ जवानांचे सुरक्षा कवच असते.
  • हे दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) ऑफर करते.
  • भारतात या श्रेणीचा संरक्षण मिळतो.

एक्स श्रेणी सुरक्षा

  • सुरक्षेचा हा चौथा स्तर आहे.
  • एक्स कॅटेगरीत २ जवानांचे सुरक्षा कवच आहे. (नो कमांडो, केवळ सशस्त्र पोलिस कर्मचारी).
  • हे एक पीएसओ (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) प्रदान करते. बऱ्यच लोकांना या श्रेणीमध्ये संरक्षण मिळते.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com