
नागपूर : कोरोनाच्या लढाईत प्रत्येकालाच आपला सहभाग नोंदविण्याची इच्छा आहे. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपला खारीचा वाटा उचलत आहे. त्यातल्या त्यात युववर्गाचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. हे विशेष कौतुकास्पद आहे.
'नॉट मी बट यु' या ब्रीदवाक्यनुसार राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) स्वयंसेवक गेल्या महिन्याभरापासून कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत. या लढ्यात एकाच पातळीवर कोरोनाशी दोन हात न करता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एन एस एस च्या स्वयंसेवकांनी चक्क स्वतः तयार केलेले 20 हजाराहून अधिक मास्क चार जिल्ह्यातील नागरिकांना वितरित करण्याचा पराक्रम केला आहे.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. हा संसर्ग होऊ नये यासाठी वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्लू एच ओ) ने प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या आहेत. त्यात हॅंड सॅनिटायझर आणि मास्क या दोन्हीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाजारातील मास्क आणि सॅनिटायझर दिसेनासे झाले. या दोन्ही वस्तूंचा काळाबाजार होऊ लागला. सामान्य माणसाला हे खरेदी करणे आवाक्याबाहेर गेले. त्यामुळे अशा नागिरकांना मोफत मास्क उपलब्ध करून देण्यासाठी बऱ्याच स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. मात्र, गावोगावी अद्यापही त्या पोहचलेल्या दिसत नाहीत. या नागरिकांना मास्क उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी घेत, मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणातून घरीच मास्क तयार करून त्याचे आपल्या संबंधातील आणि गावातील नागरिकांना वितरण करण्याचे काम या विद्यार्थ्यांनी केले. गेल्या पंधरा दिवसात किमान 20 हजारावर मास्क तयार करून त्याचे वाटप चार जिल्ह्यात केले आहे. यासाठी विद्यापीठातील 800 हुन अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच एनएसएसच्या स्वयंसेवकांकडून महापालिकेच्या निवारा गृहात असलेल्या नागरिकांना दररोज सकाळ, संध्याकाळ 1200 जेवणाचे पार्सल पाठविण्यात येतात. याशिवाय 15 हजारावर नागरिकांना आरोग्यसेतू अँप डाउनलोड करून दिले आहे हे विशेष.
महाविद्यालयांकडून आर्थिक मदत
एन एस एस स्वयंसेवकांकडून तयार करण्यात येत असलेल्या मास्कसाठी त्या त्या भागातील महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केल्या जात आहे. येत्या काही दिवसात जवळपास 50 हजारावर नागरिकांसाठी मास्क तयार करून त्याचे वाटप स्वयंसेवकांकडून करण्यात येणार असल्याचे समजते. याशिवाय काही स्वयंसेवक स्वतःच्या पैशानेही मास्क तयार करीत आहेत.
नावातच आहे सेवा
नावात सेवा असल्याने आमच्या स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने मास्क निर्मिती करण्याचे प्रशिक्षण घेत, घरीच मास्क तयार करण्यास सुरुवात केली. महाविद्यालयांनी सामाजिक भान ठेवून मदत केली आणि विद्यार्थी ही स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत.
डॉ. केशव वाळके, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.