क्‍यू हिला डाला ना... 'कोरोना' विषाणू 105वर नॉट आऊट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. हे दोघेही मोमीनपुरा व सतरंजीपुरा परिसरातील असल्याचे समजते. सायंकाळी यात आणखी पाच जणांची भर पडली. 

नागपूर : शहरात कोरोनाबाधितांची साखळी वाढत आहे. शुक्रवारी यात पाच वर्षीय चिमुकल्यासह सात रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केली आहे. कोरोनाबाधितांचा संख्या 105 झाली. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची शंभरी गाठणाऱ्या शहरात आता नागपूरचीही नोंद झाली. पॉझिटिव्ह आढळून आलेले रुग्ण मोमीनपुरा व सतरंजीपुऱ्यातील आहेत. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

गुरुवारी एकही रुग्ण आढळला नसल्याची आनंददायी वृत्त क्षणिक ठरले. शुक्रवारी सकाळी एका रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. मात्र, सायंकाळपर्यंत यात आणखी सात जणांची भर पडली. उपराजधानीत पहिला कोरोनाबाधित 11 मार्च रोजी आढळला होता. त्यानंतर एक-दोन दिवस अपवाद सोडल्यास दररोज कोरोनाबाधितांचा आलेख वाढत आहे.

जाणून घ्या - Video : साहेबऽऽ, लोक पैसे देतात अन्‌ पूर्ण शरीराशी खेळतात, आज मात्र...

शुक्रवारी सकाळी दोघे कोरोनाबाधित आढळून आले अन्‌ शहराने कोरोनाबाधितांचे शतक पूर्ण केले. हे दोघेही आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात होते. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. हे दोघेही मोमीनपुरा व सतरंजीपुरा परिसरातील असल्याचे समजते. सायंकाळी यात आणखी पाच जणांची भर पडली. 

एम्समध्ये या पाच जणांच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे पाचही मोमीनपुरा येथील असून, यात 33 वर्षीय पुरुष, 33 व 35 वर्षी महिला तसेच पाच वर्षीय मुलाचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. एक एप्रिल रोजी कोरोनाबाधीतांची शहरात केवळ 19 संख्या होती. 10 एप्रिल रोजी 25 वर पोहोचली. परंतु, यानंतर अवघ्या 14 दिवसांत हा आकडा तिपटीने वाढून 24 मार्च रोजी कोरोनाबाधितांची संख्या 105 वर पोहोचली आहे. 

गुरुवारी एकाही रुग्णाची नोंद नाही

कोरोना विषाणूने मागील आठवड्यात कहर केला आहे. सात दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात कोरोनाबाधित आढळून येत होते. मात्र, गुरुवारी (ता. 23) कोरोनाचा एकही बाधित आढळला नाही. एकाही बाधिताची नोंद झाली नसल्यामुळे दिवस दिलासा देणारा ठरला. मेयो मेडिकलमध्ये सुमारे 82 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मेयो रुग्णालयात 40 तर मेडिकलमध्ये 42 जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, एक कोरोनाबाधित मिसिंग असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

असे का घडले? - प्रेयसी दुसऱ्यासोबत सेट झाल्याने टिकटॉकवर टाकले दर्दभरे व्हिडिओ अन्

रुग्णांची आकडेवारी थोडक्‍यात

 • शहरात 11 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. 
 • 11 मार्च ते 22 एप्रिल दरम्यान 98 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 
 • आठवडाभरापूर्वी 15 एप्रिल रोजी एकही कोरोनाबाधित उपराजधानीत आढळला नव्हता. 
 • यानंतर गुरुवारी (23 एप्रिल) एकही रुग्ण आढळला नाही. 
 • 16 ते 22 एप्रिल या आठवडाभरात कोरोनाच्या 42 रुग्णांची नोंद झाली होती. 
 • 16 एप्रिल रोजी 2 तर 17 एप्रिलला 1 जण बाधित आढळला होता. 
 • 18 एप्रिलला 4 आणि 19 एप्रिल रोजी 10 जण आढळले होते. 
 • 20 एप्रिलला 7 तर 21 एप्रिल रोजी कोरोनाबाधितांचा उच्चांक ठरला होता. 
 • या दिवशी 14 जण आढळून आले होते. 
 • 22 एप्रिलला 4 जण आढळले. 
 • 23 एप्रिल रोजी पुन्हा उसंत मिळाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in Nagpur is over one hundred