काळजी घ्या, नागपुरातील कोरोना संशयितांची संख्या वाढतेय... एकूण संख्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

मेयो-मेडिकलमध्ये कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासनाच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने विदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करून त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विदेशातून आलेल्यांसह रुग्णाच्या संपर्कातील तब्बल 28 संशयित रुग्णांना नागपूरच्या मेडिकल, मेयोत दाखल करण्यात आले असून त्यांचे नमूने तपासणीसाठी मेयोत पाठवले. दुपारच्या सत्रात मेयोच्या प्रयोगशाळेतील 8 नमुने नकारात्मक आले.

नागपूर : फ्रान्स, अमेरिका, इटलीसह इतर देशातील प्रवासाची पार्श्‍वभूमी असलेल्या 4 व्यक्तीला मेडिकलमध्ये तर 8 व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूची संशयित लक्षणं दिसून आली. यामुळे 12 संशयितांना मेयो व मेडिकलच्या कोरोना वॉर्डात बुधवारी (ता.18) दाखल करण्यात आले. यांच्या घशातील द्रवाचे नमूने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या मेयोतील उपकेंद्रात पाठवण्यात आले आहेत. 

मेडिकलमध्ये दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सर्व संशयित रुग्ण हे पंचेविशीतील आहेत. हीच स्थिती मेयो रुग्णालयातील आहेत. या रुग्णांचे अहवाल 19 मार्च रोजी येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होत असून सर्दी, खोकला व इतर संशयित लक्षणे दिसून आली. यामुळे तत्काळ मेयो मेडिकलच्या कोरोना संशयित वॉर्डात भरती करण्यात आले. संशयित दाखल रुग्णांची संख्या 12 झाली आहे. तर कोरोना बाधितांची संख्या 4 आहे. मेडिकलमध्ये 3 तर मेयोत 1 बाधित रुग्ण भरती आहे.

आतापर्यंत 158 जणांना ठेवले विलगीकरण कक्षात 
मेयो-मेडिकलमध्ये कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासनाच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने विदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करून त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विदेशातून आलेल्यांसह रुग्णाच्या संपर्कातील तब्बल 28 संशयित रुग्णांना नागपूरच्या मेडिकल, मेयोत दाखल करण्यात आले असून त्यांचे नमूने तपासणीसाठी मेयोत पाठवले. दुपारच्या सत्रात मेयोच्या प्रयोगशाळेतील 8 नमुने नकारात्मक आले.

-अरेरे! दहावीचा पेपर सोडवून दोघेही बहीण-भाऊ घरी येत होते, अन्‌ अचानक...

इतर नमुन्यांची तपासणी सुरू होती. शहरात सध्या 158 जण घरात किंवा इतर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे. त्यात विदेशातून प्रवेश केलेल्यांसह त्यांच्या संपर्कातील रुग्णाचाही समावेश आहे. 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झालेल्या जणांना घरी पाठवण्यात आले, तर विमानतळावर आरोग्य विभागाकडून तब्बल 47 जणांची स्क्रिनिंग करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona suspected patients are increasing