esakal | अधिवेशनात ठरणार प्रभागांची संख्या, काँग्रेस एकसाठी आग्रही

बोलून बातमी शोधा

number of wards in nagpur to be decide in the assembly session}

महाविकास आघाडीची सत्ता येताच पहिल्याच हिवाळी अधिवेशनात चार प्रभागांचा निर्णय रद्द करण्यात आला. आता फक्त एकचा की दोनचा प्रभाग ठेवायचा, यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

अधिवेशनात ठरणार प्रभागांची संख्या, काँग्रेस एकसाठी आग्रही
sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर :  नागपूरसह पाच महापालिकांच्या निवडणुकीत किती वॉर्डांचा प्रभाग करावा, याचा निर्णय सध्या मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येणार आसल्याचे समजते. या संदर्भात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली असून, लवकरच याची घोषणा केली जाणार आहे. 

हेही वाचा - पत्नीला मंगळ नसणे हे घटस्फोटाचे कारण नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका

महाविकास आघाडीची सत्ता येताच पहिल्याच हिवाळी अधिवेशनात चार प्रभागांचा निर्णय रद्द करण्यात आला. आता फक्त एकचा की दोनचा प्रभाग ठेवायचा, यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तसे झाल्यास सर्वच प्रभागांची फेररचना करावी लागणार आहे. दोनचा प्रभाग केल्यास सरळसरळ प्रत्येक प्रभाराचे दोन भाग केले जातील. मात्र, एकचा प्रभाग केल्यास मोठ्या प्रमाणात तोडफोड व सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार फेरबदल करावा लागणार आहे. 

हेही वाचा - थरार! मुलीला शून्य गुण का दिले म्हणून महाविद्यलयात काँग्रेसच्या महासचिवांचा...

सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार बदल -
सध्या नागपूर शहरात ३८ प्रभाग असून, १५१ नगरसेवक आहेत. एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. निवडणूक २०२२ ला होणार आहे. त्यावेळी लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास राहणार आहे. १८ ते २० हजार लोकसंख्येचा एक वॉर्ड करावा लागणार आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांना आपापल्या सोयीनुसार प्रभागांचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने तीन वॉर्डांचा प्रभाग केला होता. त्यानंतर त्यात बदल करून दोनचा प्रभाग करण्यात आला होता. भाजपने मागील कार्यकाळात थेट चार वॉर्डांचा एक प्रभाग केला. तो भाजपला चांगलाच फलदायी ठरला. तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले. आता महाविकास आघाडी त्यात बदल करणार आहे.