आम्ही विकणार नाही चिनी वस्तू, व्यापारी संघटनांचा निर्धार...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

चीन आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावत असून, त्याचा उपयोग आपल्याच विरोधात करीत आहे. ज्याप्रकारे देशाच्या सीमेवर सैनिक लढून देशाचे रक्षण करीत आहेत. त्याचप्रकारे आता व्यापारी आणि नागरिकांनीही चिनी साहित्यांवर बहिष्कार टाकून देशाच्या आत्मनिर्भर लढाईत हातभार लावू शकणार आहे. यामुळे हे अभियान सुरू केलेले आहे.

नागपूर, :"स्वदेशीचा वापर करा, देशाला आत्मनिर्भर करा' हा संदेश देण्यासाठी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसी) पदाधिकाऱ्यांनी चिनी उत्पादनावरील बहिष्काराचे फलक दाखवून भारतीय वस्तूंचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. जग कोरोनाच्या महामारीमुळे संकटात सापडले असताना चीन भारतीय सैनिकांवर प्राणघातक हल्ला करीत आहेत. या धोरणाचाही निषेध करण्यात आला. 

चीन आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावत असून, त्याचा उपयोग आपल्याच विरोधात करीत आहे. ज्याप्रकारे देशाच्या सीमेवर सैनिक लढून देशाचे रक्षण करीत आहेत. त्याचप्रकारे आता व्यापारी आणि नागरिकांनीही चिनी साहित्यांवर बहिष्कार टाकून देशाच्या आत्मनिर्भर लढाईत हातभार लावू शकणार आहे. यामुळे हे अभियान सुरू केलेले आहे. चीन आपल्या शेजारी देशातील सीमांवर घुसखोरी करीत आपले साम्राज्य वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर नाराजी वाढू लागली आहे. चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकून त्यांची आर्थिक नाडी आवळणे गरजेचे आहे. सरकारनेही चीनच्या साहित्यांवरील आयात कमी करून देशातील निर्यात वाढविण्यावर भर द्यावा. भारताला जगभरात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी ही एक चांगली संधी आहे, असे एनव्हीसीसीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

कारवाईचा धाक दाखवून मागितली लाच, परंतु हवालदाराने दाखवली हिंमत आणि...

चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केले जात आहे. आता चेंबरने उडी घेतली आहे. चिनी ऍप, सॉफ्टवेअर, अँटिव्हायरस, आयटी आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्पादनांविरोधात बहिष्कारास्त्र उगारले आहे. भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर चिनी उत्पादनांविरोधातील लढ्यात कुठल्याही प्रकारच्या चिनी उत्पादनांची विक्री न करण्याचा निर्णयही व्यापाऱ्यांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. चीनच्या वस्तूंवरील बहिष्कार टाकण्याचे पुढील अभियान 22 जून रोजी वसनशहा चौक जरीपटका येथे आयोजित केले आहे. यात सहभागी व्हावे, असे आवाहन चेंबरचे सचिव रामअवतार तोतला यांनी केले आहे. अभियानात चेंबरचे अध्यक्ष अश्‍विन मेहाडिया, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, संतोष काबरा उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NVCC is Aggressive Against Chinese Goods