गावातील तंटामुक्त समितीचे पदाधिकारी झाले व्यसनाधीन

file
file

कामठी (जि.नागपूर): अनेक वाद मिटवून प्रकरणाला मार्गी लावून अनेकांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केले. याशिवाय अनेक चांगले उपक्रम राबवून गावाला नंदनवन करून गावाला लाखों रुपयांची बक्षिसे मिळविले. परंतु आजही गावातील परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. अभियानापूर्वी वाहणारा दारूचा महापूर पुन्हा सुरू झाला आहे.  आता तर पुरस्कारप्राप्त गावातील तंटामुक्त समितीचे पदाधिकारी व्यसनाधीन झाले असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत गावातील समित्यांकडून तंटामुक्त मोहिमेच्या उद्दिष्टेला  हरताळ फासायला सुरुवात झाली आहे.

समित्यांचा शासनालाही पडला विसर
राज्य शासनाने २००७ पासून अत्यंत लोकोपयोगी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली. गावात शांतता राहावी, वादविवाद होणार नाहीत, गावातील कोणतेही वाद न्यायालयापर्यंत पोहोचणार नाहीत, याची दखल घेऊन गावात तंटामुक्त समित्या स्थापन केल्या. त्याकरिता ग्रामसभेतून या समितीचे अध्यक्ष व सदस्य निवडण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र पुरस्कार मिळताच समितीची घोडदौड थंडावली असल्याने गेल्या काही दिवसांपासून या समित्यांचा शासनालाही विसर पडला असून ग्रामपंचायतमध्ये केवळ कागदावरच या समित्या दिसून येत आहेत. तंटामुक्त गाव निर्माण करण्याचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी अनेक गावातील समित्यांनी कंबर कसली. या मोहिमेअंतर्गत काही गावांना तंटामुक्तीच पुरस्कारही मिळाला. वर्षानुवर्षे न्यायालयात धूळखात पडलेली प्रलंबित प्रकरणे निकाली लागली व गावात नवचैतन्य निर्माण झाले. काही वर्षाच्या काळात आमूलाग्र बदल घडून आला.

परिस्थिती झाली ‘जैसे थे’
मागील काही वर्षातच तंटामुक्त अभियानाच्या बाबतीत कामठी तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर चमकू लागला. तंटामुक्त गाव घोषित करण्यासाठी शासनाने काही अटी  व नियम ठेवले होते. त्यामध्ये दारूबंदी, सामूहिक विवाह सोहळा करणे, सर्वधर्मसमभाव, सर्व जाती, धार्मिक  सलोखा निर्माण करणारे उपक्रम, महिला सक्षमीकरण. पुतळ्यांची देखरेख, त्यांची जयंती उत्सव व पुण्यतिथी, आंतरजातीय विवाह आदी अनेक उपक्रमाचा अंतर्भाव त्यामध्ये करण्यात आला. पुरस्काराच्या हेतूने समित्यांनी गावांमध्ये विविध उपक्रम राबविले. दारूबंदी, व्यसनमुक्तीसारखे उपक्रम राबवून अनेकांचा उध्वस्त संसार पुन्हा थाटला. पती पत्नीमधील वाद मिटवून त्यांच्या प्रकरणाला मार्गी लावून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केले. याशिवाय अनेक चांगले उपक्रम राबवून गावाला नंदनवन करून गावाला लाखों रुपयांची बक्षिसे मिळविले. परंतु आजही गावातील परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. अभियानापूर्वी वाहणारा दारूचा महापूर पुन्हा सुरू झाला आहे.  आता तर पुरस्कारप्राप्त गावातील तंटामुक्त समितीचे पदाधिकारी व्यसनाधीन झाले असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत गावातील समित्यांकडून तंटामुक्त मोहिमेच्या उद्दिष्टेला  हरताळ फासायला सुरुवात झाली आहे.

शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला
या मोहिमेतील वास्तव म्हणजे अनेक गावात केवळ कागदावरच मोहीम राबवली जात आहे. गावागावात लहानसहान गोष्टींवरून वाद उद्भवत व त्यांचे रूपांतर परस्परांन विरुद्ध तक्रारी दाखल करण्यापर्यंत जात असून अगदी शुल्लक बाबींसाठी कधीकधी केवळ कोरड्या प्रतिष्ठेसाठी सुज्ञ नागरिक हि वर्षानुवर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजविताना दिसून येतात. यामध्ये आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. कित्येकांची झोळी रिकामी होताना दिसून येते. तसेच किरकोळ वादाच्या केसेस मुळे न्यायव्यवस्था व तपासयंत्रणा यांच्यावरील अतिरिक्त ताण वाढत असल्याने महत्वाच्या तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या सवेदन शिल प्रकरणांना नाहक विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अश्या किरकोळ विषयांचा ताबडतोब निपटारा व्हावा म्हणून तंटामुक्त गाव समिती गठीत करण्यात आली होती. ही समिती म्हणजे एकप्रकारे गाव पातळीवर असणारे व निःपक्ष न्यायनिवाडा करून गावातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडणारे खंडपीठ असल्याचे मत विविध क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सुरवातीला ग्रामसभेतून नियुक्त करण्यात आलेल्या गावपातळीवरील विविध समित्यांचे फलक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये असायचे यामध्ये तंटामुक्त समिती चाही समावेश होता. परंतु तालुक्यातील  ग्रामपंचायत मध्ये हे फलकच गहाळ झाल्याने समिती बाबत नागरिक अनभिन्न आहेत. व गावांमध्ये या समित्यांची घोडदौड थांबली असल्याने नागरिकांच्या शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com