अधिकाऱ्याने टाकला व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मॅसेज...जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

संबंधित अधिकारी रात्रीच्या वेळेस गस्त घालतात. कामही निम्मे करीत असून, बैठकीत उपस्थित राहत नसल्याचा ठपका जिल्हाधिकारी यांनी ठेवला. या प्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. वेळेत उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. 

नागपूर : दारूविक्रीचा परवाना असलेल्या दुकानदारांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मॅसेज टाकणे उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्यास चांगलेच महागात पडले. ही कृती नियमभंग करणारी असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दुय्यम निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावली. 

राज्य सरकारच्या सूचनांवरून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शहर आणि ग्रामीण भागात दारूविक्रीस परवानगी दिली. ग्रामीण भागात दुकानातून तर शहर आणि पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रात घरपोच दारूविक्रीस परवानगी दिली. शिवाय, काही अटीही घालून दिल्यात. या अटींचे पालन न करणाऱ्यांवर विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत जवळपास 13 दुकानांवर कारवाई करण्यात आली. काहींचे प्रकरण गंभीर असल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. परंतु, काही अधिकाऱ्यांकडून याचा गैरफायदा घेण्यात येत असल्याची बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आली.

हेही वाचा : कोरोना तपासणीत हयगयीला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाची विचारणा 

एका दुय्यम निरीक्षकाने दुकानदारांच्या ग्रुपवर कारवाईची माहिती टाकली. संबंधित अधिकारी रात्रीच्या वेळेस गस्त घालतात. कामही निम्मे करीत असून, बैठकीत उपस्थित राहत नसल्याचा ठपका जिल्हाधिकारी यांनी ठेवला. या प्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. वेळेत उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officer posted a massage on whatsapp group...collector issued notice