निरी प्रयोगशाळेत शंभर टक्के नमुने कोरोनाबाधित; २४ तासांत २२ मृत्यू

One hundred percent samples corona infected in the neeri laboratory
One hundred percent samples corona infected in the neeri laboratory

नागपूर : निरी प्रयोगशाळेत ४१ जणांचे नमुने तपासल्यानंतर ४१ जण बाधित आले. अशाप्रकारे शंभर टक्के नमुने बाधित आल्याचे प्रथमच पुढे आले आहे. जिल्ह्यात रविवारी अवघे ३७४ कोरोनाबाधित आढळले तर २२ जण कोरोनामुळे दगावले.

दिवसभरात जिल्ह्यातून नव्याने ३७४ बाधितांमध्ये २४२ जण शहरातील विविध वस्त्यांमधील रुग्णांचा समावेश आहे. तर खेड्यातील १२५ रुग्ण बाधित आढळले. जिल्ह्याबाहेरून रेफर झालेल्या ७ जण कोरोनाबाधित आढळल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले. रविवारी शहरातील सात प्रयोगशाळांमध्ये ५ हजार २७४ चाचण्या झाल्या. यातील ३७४ जण बाधित आढळले. खासगी प्रयोगशाळेत १५४२ चाचण्या झाल्या असून यातील ९७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर मेडिकलमध्ये ४१७ पैकी ४ जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले.

एम्समध्ये २४२ चाचण्यांमध्ये २० जण बाधित आढळले. निरी प्रयोगशाळेत ४१ जणांचे नमुने तपासल्यानंतर ४१ जण बाधित आढळल्याचे पहिल्यांदाच पुढे आले. याशिवाय मेयोत ६६८ जणांचे नमुने तपासल्यानंतर ४१ जण बाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून आला. माफसूमध्ये ९६ पैकी ३० जण बाधित आढळले. तर २१७१ जणांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या केल्या. यापैकी १४१ जणांना बाधा असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली. मात्र दुर्दैवाने कोरोनाची बाधा झाल्यानंतर २२ जण दगावले. यातील शहरातील ११ तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.

गेल्या अडीच महिन्यांच्या तुलनेत मृत्यू बऱ्यापैकी कमी झाले आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ७१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ८१ हजार ३५९ झाली. यात महापालिकेच्या हद्दीतील ५४१ आणि ग्रामीण भागातील १७५ जणांचा समावेश आहे. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ६३६९ सक्रिय कोरोनाबाधित मेयो, मेडिकलसह कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यामुळे मृत्यूची संख्या २ हजार ९४७ झाली. तर बाधितांचा आकडा ९० हजार ६७५ वर पोहचला आहे.

रेफर रुग्णांमुळे वाढला मृत्यूदर

कोरोनाची बाधा झाल्यानंतर आतापर्यंत विदर्भासह इतर जिल्ह्यातून सुमारे ५३९ जणांना उपचारासाठी नागपुरातील मेयो आणि मेडिकलमध्ये हलविण्यात आले. त्यांच्यापैकी ३५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने केली आहे. जिल्ह्याच्या बाहेरील रहिवासी असलेल्या यातील ८० टक्के कोरोनाबाधितांना गंभीर अवस्थेत नागपुरात हलवले. यामुळे नागपुरातील मृत्यू दर वाढल्याचे चित्र दिसत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com