Corona Breaking : नागपुरात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या पोहोचली चारवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना कोरांना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त एका सोशल वेबसाईटरवर प्रकाशित झाले होते. यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली आहे. कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर चुकीचे वृत्त प्रसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. 

नागपूर : देशासह राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. नागपुरात शनिवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमेरिकेतून पाच दिवसांपूर्वी शहरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. शुक्रवारी त्या व्यक्तीच्या संपर्कातील दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहेत. कोरोना ग्रस्तांमध्ये रुग्णाची पत्नी आणि एकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. एकट्या नागपुरात कोरोनाचे एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत. नागपुरात आढळलेला कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना केले वृत्ताचे खंडण 
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना कोरांना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त एका सोशल वेबसाईटरवर प्रकाशित झाले होते. यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली आहे. कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर चुकीचे वृत्त प्रसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. 

- बघा, माहिती व जनसंपर्क विभाग किती अपडेट आहे, म्हणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत

...तर तो संशयित 
एखाद्याला ताप आला, त्यावर उपचारासाठी टॅबलेट दिली. परंतु, त्याच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसेल तर त्याला संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल. विदेशातून आलेल्यांनी चौदा दिवसांपर्यंत घरीच राहावे, असे आवाहन कुकरेजा यांनी केले होते. 

नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक 
महापालिकेने 0712-2567021 हा आपत्कालीन क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयामध्ये 24 तास वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वत:ही वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायजर, पूर्णवेळ मास्क वापरावे, असे आवाहन कुकरेजा यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one more nagpur corona patient report positive