
नागपूर शहराने कोरोनाच्या मृत्यूवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. दररोज दोन आकड्यातील रुग्णसंख्या आढळून येत असल्याचने प्रशासनाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रकोप उपराजधानीत गुणाकार पद्धतीने वाढत आहे. झोपडपट्ट्यांध्ये कोरोना शिरला आहे. यामुळे प्रशासन हादरले आहे. दर दिवसाला दोन आकड्यांमध्ये वाढ होत आहे. या आठवड्यात तब्बल अडीचशे कोरोनाबाधित आढळले आहे. सोमवारीदेखील सकाळच्या सत्रात 29 जण कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांचा अकडा 1034 वर पोहोचला आहे.
सोमवारी (ता. 15) आढळून आलेले सर्व कोरोनाबाधित पाचपावली व रविभवन विलगीकरणातील आहेत. शहरातील वस्त्यांमध्ये हळूहळू कोरोना चांगलाच पाय पसरत आहे. यामुळे शहरात आता धोका वाढला आहे. तर प्रशासनाची चिंता वाढली आहे. नाईक तलाव, चंद्रमणीनगर, हुडकेश्वर रोड सावरबांधे हॉलजवळचे रुग्ण आहेत.
सविस्तर वाचा - बापरे! विलगीकरणात महिलेला आली पाळी, संबंधिताने सॅनिटरी पॅड ऐवजी दिले हे...
नागपूर शहराने कोरोनाच्या मृत्यूवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. दररोज दोन आकड्यातील रुग्णसंख्या आढळून येत असल्याचने प्रशासनाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. विशेष असे की, रामेश्वरी परिसरातील धाडीवाल ले-आउट, आर्यनगर आणि नरसाळा कोरोनाच्या नकाशावर आले आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सद्या मेडिकल, मेयो आणि एम्समध्ये 360 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातून एक-दोन कोरोनाबाधित आढळून येत आहे. मात्र, नाईक तलाव बांगलादेश परिसराचा आलेख वेगाने वाढत आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 229 जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील 30 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 199 जणांवर उपचार सुरू आहे. सर्वाधिक 249 रुग्ण मोमीनपुरा क्षेत्रातून आढळले. त्यानंतर आता नाईक तलाव बांगलादेश सर्वाधिक रुग्णाचा दुसरा परिसर ठरला.