ऑनलाइन सेक्स रॅकेटवर छापा; दिल्लीच्या दोन तरुणी ताब्यात

Online Illegal racket raid, two Delhi girls arrested
Online Illegal racket raid, two Delhi girls arrested

नागपूर : नागपुरात बिनधास्तपणे सुरू असलेल्या ऑनलाइन सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखा पोलिसांना छापा घातला. छाप्यात नवी दिल्लीतील दोन तरुणींना रंगेहाथ पकडण्यात आले तर तीन दलालांना अटक करण्यात आली. दलालांकडे आंबटशौकिनांची मोठी यादी पोलिसांच्या हाती लागली असून, यामध्ये शहरातील नामांकित नावे असल्याची चर्चा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान पठाण ऊर्फ रेहान दादा पठाण हा नावाजलेला दलाल असून, तो राज्यभरात ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवतो. तो दिल्ली, काश्‍मीर, राजस्थान, उडिसा, गुजरात, चेन्नई, केरळ आणि हिमाचल प्रदेशातील तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये काम देतो. त्यांना महाराष्ट्रासह अन्य राज्यात नेऊन त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतो.

त्याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. नागपुरात रेहान हा स्कोक्‍का नावाने ऑनलाइन एस्कॉर्ट सर्व्हिस सेक्स रॅकेट चालवीत होता. त्याच्याकडे दिल्ली येथील दोन तरुणी आंबटशौकिनांसाठी करारावर आणल्या होत्या. त्यांना नागपुरातील पॉश हॉटेलमध्ये ठेवत होता. एसएसबी पोलिसांच्या नाकावर टिच्चून रेहान सेक्स रॅकेट चालवत होता. पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे यांनी रेहानची इंटरनेटवरून माहिती गोळा केली.

त्यानंतर तोतया ग्राहक तयार करून वेबसाइटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. रेहानला दोन वारांगनांची मागणी केली. दोघींचा दहा हजार रुपये रेट सांगण्यात आला. पंटरने त्याला पैसे देण्याची तयारी दर्शवली. पैसे स्वीकारून तरुणींना ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.

वॉट्सॲपवर पाठवले फोटो

रेहानने सोमवारी पंटरला ८ ते १० तरुणींचे अर्धनग्न फोटो पाठवले. त्यापैकी दोन तरुणींना पसंत करून त्यांची मागणी पंटरने केली. त्याने मनीषनगरात तरुणींना पाठविणार असल्याचे सांगितले. आरोपी रफीक ऊर्फ राज पठाण (अहमदनगर), आफताब ऊर्फ आर्यन शेख निजाम (अहमदनगर) सौरव प्रमोद सुखदेवे (राजेंद्र नगर) हे दोन्ही वारांगनांना घेऊन मनीषनगरातील पुरुषोत्तम बाजाराजवळ पोचले. तेथे पंटर पोचल्यानंतर पोलिसांना चकमा देण्यासाठी दोन तास पंटरला भटकवले.

तरुणी विमानाने आल्या नागपुरात

दिल्ली येथून दोन्ही तरुणी नागपुरात पोहोचल्या. २२ ते २४ वर्षे वयाच्या असलेल्या तरुणींशी २० दिवसांसाठी ६० हजारांत करार करण्यात आला होता. रेहान त्यांची व्यवस्था मोठ्या हॉटेलमध्ये करीत होता. फार्महाऊस पार्टी किंवा आंबट शौकिनांना थेट घरी पोचविण्याची जबाबदारी घेत होता. त्याच्या संपर्कात काही टीव्ही ॲक्ट्रेसही असल्याची माहिती आहे. 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com