नागपूर: नागपुरात पुन्हा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकांमध्ये अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख जशी जशी जवळ येत चालली आहे तशी तशी चुरसही वाढत चालली आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून अभिजित गोविंदराव वंजारी यांना तिकीट देण्यात आले आहे. तर भाजपने यावेळी महापौर संदीप जोशी यांना मैदानात उररवले आहे. विशेष म्हणजे उमेदवारांमध्ये दोन संदीप जोशी तर दोन अभिजित वंजारी असे उमेदवार उतरले होते. मात्र यापैकी एका अभिजित वंजारी यांना आयोगाने अपात्र ठरवले आहे.
काँग्रेसकडून अभिजित गोविंदराव वंजारी तर अभिजित वंजारी नावाच्या दुसऱ्या उमेदवाराने अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र अपक्ष उभ्या असलेल्या अभिजित वंजारी यांना आयोगाने अपात्र ठरवले आहे.
यंदा तब्बल ३१ उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र यापैकी अविनाश तुपकर, प्रशांत डवले, रमेश फुले, धर्मेंद्र मंडलिक आणि अभिजित रविंद वंजारी (अपक्ष उमेदवार) या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरण्यात आले आहेत.
भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे आणि संदीप जोशी यांच्यातील मतभेदांमुळे संदीप जोशी नेहमीच चर्चा विषय राहिले आहेत. त्यामुळे याचा परिणाम या निवडणुकीवर होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अभिजित गो. वंजारी यांच्या कुटुंबात आधीपासूनच काँग्रेसबद्दल निष्ठा आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून पदवीधर निवडणुकांमध्ये भाजप अव्वल ठरला आहे. त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी अभिजित गो. वंजारी तयारी करत आहेत.
येत्या १ डिसेंबरला मतदान होणार आहे आणि ३ डिसेंबरला पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे हे बघणं महत्वाचं असणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.