विरोधकांचे आरोप फक्त प्रसिद्धीसाठी अध्यक्षा बर्वे यांचा विरोधकांवर हल्ला

नीलेश डोये
Monday, 5 October 2020

आम्ही आमच्या तालुक्यात आर्थिक परिस्थिती नसलेल्या लाभार्थ्यांना आम्ही स्वत: हमी घेवून लाभ मिळवून दिला आहे. विशिष्ट पुरवठादाराकडून साहित्य खरेदीसाठी कार्यालायतून फोन करण्यात येत असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंंडन केले. 

नागपूर : जिल्हा परिषदेत गेल्या, सहा-सात महिन्यात घोटाळे झाल्याचा आरोप केले. त्यांच्याकडे कुठलेच पुरावे नाही. त्यांचे आरोप बिनबुडाचे असून फक्त प्रसिद्धासाठी त्यांचा खटाटोप असल्याचे प्रतिउत्तर अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दिले.

पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, झेरॉक्स मशीनसाठी डीबीटी असल्याने अपंग लाभार्थी झेरॉक्स मशीनचे हजारो रुपये भरून मशीन घेवून शकत नाही.

त्यामुळे आम्ही आमच्या तालुक्यात आर्थिक परिस्थिती नसलेल्या लाभार्थ्यांना आम्ही स्वत: हमी घेवून लाभ मिळवून दिला आहे. विशिष्ट पुरवठादाराकडून साहित्य खरेदीसाठी कार्यालायतून फोन करण्यात येत असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंंडन केले. 

विरोधकांना काढले सभापतींनी कक्षाबाहेर

आम्ही इतर सदस्यांना असेच करावे, असा आग्रह धरला नाही. कोरोनाच्या संक्रमणकाळात नियंत्रण मिळविण्यासाठी मी स्वत: ग्रामीण भागात दौरे केले. जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज ठेवली. जनतेला धीर दिला. पण त्यावेळी आरोप करणारे कुठेही दिसले नसल्याचा टोला अध्यक्षांनी लगावला.

‘जेम’ वर महागड्या वस्तू
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शालेय वस्तूंची केलेली खरेदी ही. ही खरेदी शासना मान्यता असलेल्या‘जेम’ पोर्टवरून करण्यात आली. त्यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही. यावरील वस्तू महागड्या पडतात. त्यामुळे विरोध जेमचा करायला पाहिजे.
विरोधकांनी आरोप केल्यामुळे आम्ही चौकशी लावली आहे. चौकशी अहवाल येईपर्यंत पुरवठादाराचे बिल थांबवून ठेवले, असे त्यांनी सांगतले.

माटेंचे वागणे योग्य नव्हे
जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी येथे जागा आहे. कुणालाही बाहेर काढणे योग्य नाही. समाजकल्याण समिती सभापती यांनी विरोधकांसोबतचे वागणे योग्य नाही. जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष नेत्यांना कक्ष देण्याबाबत कोणतेही प्रावधान नाही. गेल्या टर्म मध्ये ७ वर्ष सदस्यांना कक्ष मिळाला नाही. परंतु आम्ही सत्तेवर आल्याबरोबर सदस्यांसाठी कक्ष उपलब्ध करून दिला, असे बर्वे म्हणाल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opponents' allegations only for publicity President Barve's attack on opponents