मागील टर्मचे विरोधक मॅनेज होते निधान यांचा पलटवार

नीलेश डोये
Thursday, 8 October 2020

विरोधकांना कक्ष दिल्याचे सांगत अध्यक्षा बर्वे यांनी विरोधक प्रसिद्धीसाठी आरोप करीत असल्याचा हल्ला चढवला होता. याला प्रतिउत्तर देत पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते निधान म्हणाले की, मागील टर्मचे विरोधक अध्यक्षांच्या कक्षात मॅनेज होत होते.

नागपूर : मागील टर्मचे विरोधक मॅनेज होते. अध्यक्षाच्या कक्षातच सर्व व्यवहार करीत होते. त्यामुळे त्यांना कक्षाची गरज नव्हती. आम्ही मॅनेज होणारे नाही. जनतेचे प्रश्नांसाठी लढा देणारे आहो, अशा शब्दात जि.प.चे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यावर पलटवार केला.

जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. सत्ताधारी भ्रष्टाचार करण्यात व्यस्त असल्याचा आरोप विरोधकांनी लावला होता. त्याचवेळी समाजकल्याण सभापती यांनी विरोधकांना कक्षातून बाहेर काढले. विरोधकांना कक्ष दिल्याचे सांगत अध्यक्षा बर्वे यांनी विरोधक प्रसिद्धीसाठी आरोप करीत असल्याचा हल्ला चढवला होता. याला प्रतिउत्तर देत पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते निधान म्हणाले की, मागील टर्मचे विरोधक अध्यक्षांच्या कक्षात मॅनेज होत होते.

विरोधकांचे आरोप फक्त प्रसिद्धीसाठी   अध्यक्षा बर्वे यांची विरोधकांवर हल्ला

त्यामुळे त्यांना कक्षाची गरज नव्हती. आम्ही जनतेला न्याय देणासाठी लढणारे आहोत. कक्ष देवून उपकार केला नाही, असही ते म्हणाले.  शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार करीत ते म्हणाले की, ‘जेम’ पोर्टलवरुन खरेदी केलेल्या साहित्याची व दुकानात प्रत्यक्ष त्या साहित्याच्या किमतीत मोठी तफावत आहे. आम्ही केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे चुकीचे नसून, त्यासंदर्भातील पुरावेही आमच्याकडे आहेत.

खरेदीत कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही तर चौकशी समिती कशाला नेमली, पुरवठादाराचे देयक का रोखली? असा सवाल जेमवरील खरेदीत भ्रष्टाचार करता येते हे सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी राजेंद्र हरडे, सुभाष गुजरकर, व्यंकट कारेमोरे उपस्थित होते.

आमच्याकडे सीडीआर
झेरॉक्स मशीन खरेदीसाठी पुरवठादाराकडून फोन आले. त्याचा सीडीआर आहे. मागीतला देवू. लाभार्थी गरीब आहे, याची माहिती पुरवठादाराला कशी झाली. कुणीतरी पुरवली, असेही ते म्हणाले.

अध्यक्षा दिसल्याच नाही
कोरोना काळात अध्यक्ष फिरल्याचे सांगतात. पण आम्हाला त्या दिसल्या नाही. त्या आपल्याच सर्कलमध्ये फिरल्या असतील, असे निधान म्हणाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opponents of the previous term were managing Nidhan's counterattack