Video : ‘राज्य सरकारने दोन दिवसांचे म्हणत सात दिवसांचे लॅाकडाउन लादून फसवणूक केली’

Opposition leader Devendra Fadnavis accused the government
Opposition leader Devendra Fadnavis accused the government

नागपूर : लॉकडाउनमुळे नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. यामुळे सर्वत्र विरोध होत आहे. नागपुरातही या विरोधात आंदोलन झाले. दोन दिवसांचे लॅाकडाउन म्हणत सात दिवसांचे लॅाकडाउन लादले. यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. यामुळेच रोष वाढत चालला आहे. ही जनतेची फसवणूक असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लॉकडाउनमुळे नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. ही चांगली बाब नाही. लॉकडाउनमुळे सुरळीत झालेला व्यवसाय पुन्हा मागे जाणार आहे. गरिबाचे हाल होत आहे. उपाशी राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यामुळे रोष वाढत चालला आहे. राज्य सरकारने व्यापाऱ्यांचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा. समाज आणि सरकार एकमेकाविरोधात उभे राहणे चांगले नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लॉकडाउन संदर्भात निर्णय घेतला तेव्हा स्टेट होल्डरशी चर्चा करायला हवी होती. यातून त्यांचे कसे समाधान होईल आणि कठोर निर्बंध लादता येईल याचा विचार करायला हवा होता. मात्र, असे न झाल्याने नागरिकांचा उद्रेक वाढत चालला आहे. समाज आणि सरकार एकमेकाविरोधात उभे राहणे चांगले नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने लसीचे राजकारण थांबवावे

रेमडेसीवीरचा काळाबाजार काही लोक करीत होते. आताही हा प्रकार पाहायला मिळत आहे. दुसरी लाट ही काही राज्यांमध्येच आहे. मागची लाट ही सर्वच राज्यांमध्ये होती. त्यामुळे आता आपल्या राज्यानी दुसऱ्या राज्यातून रेमडेसीवीर घेता येईल का? याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. ज्या राज्यात लाट नाही तिथून रेमडेसवीर घ्यावी. कंपन्यांशी संपर्क साधून पुरवठ्यावर भर दिला पाहिजे. उत्तर प्रदेशापेक्षा जास्त लस महाराष्ट्राला मिळाली आहे. जेव्हा की उत्तर प्रदेश मोठे राज्य आहे. राज्य सरकारने लसीचे राजकारण थांबवावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सत्य बाहेर येणे गरजेचे

सचिन वाझे यांच्या पत्रात दोन कोटी आणि ५० कोटींचा उल्लेख आहे, हे गंभीर प्रकरण आहे. पत्र अत्यंत गंभीर आहे. माध्यमातून पत्र बघितलं. ही बाब महाराष्ट्रात जे घडतेय ते महाराष्ट्र व पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही. उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीसाठी सांगितले आहे. आता ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ व्हायला पाहिजे. सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. अन्यथा प्रतिमा सुधारणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com