
दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. साक्षीदारांची फेरचौकशीत सालईमेंढा येथील मृताचा जवलचा मित्रावार व नातेवाईकावर पोलिसांचा संशय बळावला. तातडीने अवघ्या बारा तासाच्या आत विश्वासात घेऊन सखोल विचारणा केली असता हा खून त्यानेच केल्याची कबुली दिली.
कुही (जि. नागपूर) : सालईमेंढा येथील बंद पडलेल्या खदानीत झालेल्या हत्येचे गुढ उलगडले आहे. मृताच्या मित्रानेच धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली व मृतदेह दोनशे फूट खाईत फेकल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली. गर्लफ्रेंडने मृताच्या जाचाला कंटाळून वैर असलेल्या नातेवाईकाला हत्येची सुपारी देऊन काटा काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नातेवाईकास अटक केली असून, गर्लफ्रेंडसह आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे.
चंदू गंगाधर महापुरे (३०, रा. पाचगाव) असे मृताचे तर भारत वसंता गुजर (२५, रा. सालईमेंढा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २५ फेब्रुवारीला सालईमेंढा येथील बंद पडलेल्या काबरा खदानीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची स्थिती बघता हत्या झाल्याचे समजून येत होते. नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मृतदेहाची ओळख पटविली.
अधिक वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का
त्याची अधिकची माहिती काढली असता तो विवाहित असून, दोन अपत्य असल्याचे समोर आले. तसेच त्याचे गावातील मुलीशी अनैतिक प्रेमप्रकरण सुरू असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. साक्षीदारांची फेरचौकशीत सालईमेंढा येथील मृताचा जवलचा मित्रावार व नातेवाईकावर पोलिसांचा संशय बळावला. तातडीने अवघ्या बारा तासाच्या आत विश्वासात घेऊन सखोल विचारणा केली असता हा खून त्यानेच केल्याची कबुली दिली.
लग्नात आणत होता आडकाठी
चंदू हा विवाहित असूनसुध्दा दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यातच त्या मुलीशी त्याचा वाद सुरू होता. नागपूर येथील दुसऱ्या मुलाशी तिचे आई-वडील लग्न ठरवित असताना मृत आडकाठी आणत प्रियसीला त्रास देत होता. काही दिवसांआधी आरोपीचे मृताने उधारीचे पैसे परत न देता त्याच्यावर चाकू उगारला होता. या कारणाचा फायदा घेत प्रियशीच्या आई-वडिलांनी भारत याला त्यांच्या कटात सामिल करून घेत चंदू याला ठार करण्यासाठी दीड लाख व शरीर सुखाचे प्रलोभन दिले.
अधिक माहितीसाठी - काय सांगता, संजय राठोड यांची कॉँगेस उपाध्यक्षपदी वर्णी
तो मी नव्हेचीच भूमिका
गुरुवारी दुपारी भारत याने ठरल्याप्रमाणे मृतास पाचगाव येथील देशी दारू भट्टीत दारू पाजून दुचाकीने सुरुवातीला निर्जन ठिकाणी फिरवून नंतर त्यांना कुणीही बघितले नसल्याची खात्री करून सालईमेंढा येथील बंद अवस्थेत असलेल्या काब्रा खदान येथे घेऊन गेला. तेथे त्यांच्याशी शाब्दिक वाद घालून त्यास प्रथम दगडाने व नंतर जळव असलेल्या धारदार हत्याराने गळा चिरून ठार केले. एवढेच नव्हे तर त्याला काही अंतर ओढत नेऊन अंदाजे दोनशे फूट खोली असलेल्या खदानीत फेकले. त्यानंतर मी तो नव्हेच अशी भूमिका घेत स्वत: घरी जाऊन व त्यानंतर तो ज्यांच्या शेतात काम करतो त्या ठिकाणी जाऊन शेती काम करावयास लागला. याप्रकरणी पोलिसांनी कटात सहभागी असलेली मुलगी व आई-वडिलांना ताब्यात घेऊन कुही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.