दुनिया चकाचौंध कि दिवानी है भई

packeaging
packeaging

नागपूर : एखाद्या व्यक्तीकडे आपण क्षणभर पाहतो. त्याच्या डोळ्यावरील गॉगलपासून ते पायातील जोड्यांपर्यंत आपली नजर फिरवून आपले मत बनवतो. त्याचा स्वभाव, मानसिक आणि वैचारिक पातळीचा विचार नंतर केला जातो. अशाच प्रकारे सुंदर, सुशोभित, आकर्षक व पर्यावरणपूरक पॅकेजिंग बनवून विविध वस्तूंची विक्री केली जात आहे. कारण व्यवसायात "जो दिखता है वो बिकता है' हेच खरे आहे. यामुळे आजच्या स्पर्धात्मक युगात पॅकेजिंगला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.

कोणताही खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये त्या पदार्थांचे पॅकेजिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पॅकेजिंग, त्यावरील माहिती, ब्रॅंडचे नाव आणि किंमत यांचाही त्याच्या खरेदीवर परिणाम होतो. पॅकेजिंग, लोगो, त्यावरील लेबल, ब्रॅंड आदी माणसांच्या मानसिक आणि अंतर्गत बाबींवर परिणाम करतात. मुळात सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या कोणत्याही वस्तूकडे आकर्षित होणे हा मानवी स्वभाव आहे. याचा लाभ व्यावसायिक, उद्योजक घेणार नाही असे शक्‍यच नाही. यातून विविध आकर्षक पॅकेजिंग करण्याची स्पर्धा लागली आहे. प्लॅस्टिकच्या धोक्‍यांबाबत जनजागृती होत असल्यामुळे पर्यावरणपूरक पॅकेजिंगकडे लोकांचा ओढा वाढला आहे. यातून रिसायकल होणारे पर्यावरणपूरक पॅकेजिंगचे वैविध्यपूर्ण प्रकार बाजारपेठांमध्ये आहेत.


आकर्षक पॅकेजिंगचा मोह
कोणत्याही पदार्थात योग्य चव असल्याचा आभास हा पॅकेजिंगमधून आणता येते, असा संशोधकांचा दावा आहे. संशोधकांनी पॅकेजिंग आरेखनाचे विश्‍लेषण केले असून, या घटकांचे माणसांच्या आवडीनिवडीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते ग्राहकांचा उत्पादन खरेदीचा प्राथमिक निर्णय हा पॅकेजिंगकडे पाहूनच होतो. आतील वस्तू भलेही खूप उपयोगाची नसेल परंतु त्याला आकर्षक पॅकेजिंग केले तर ती वस्तू घेण्याचा मोह लहानांपासून मोठ्यांनाही आवरत नाही ही वस्तुस्थिती आहे. वातावरण बदलांचा प्रतिकूल परिणाम मानवी जीवनावर होत असून पर्यावरणपूरक पॅकेजिंगला अमेरिका, युरोपसह जगभरात मागणी वाढत आहे.

पॅकेजिंग उद्योगाची भरभराट
आपली वस्तू ग्राहकांपर्यंत पोचविण्याचा सर्वांत सोपा मार्ग हा पॅकेजिंग असल्याचे लक्षात आल्याने जगभरात पॅकेजिंग उद्योगाची भरभराट सुरू आहे. फळे, भाजीपाला, झाडांपासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक पॅकेजिंगला चांगली पसंती मिळत हे. जे युवक नवीन काही करू इच्छितात त्यांना या क्षेत्रात स्टार्ट अपची सुवर्णसंधी आहे.
-दिनेश शर्मा, व्यावसायिक

परदेशातील पर्यावरणपूरक पॅकेजिंग

  • सेल्फ चिलिंग कॅन
  • रिकप
  • सेल्फ हीटिंग फूड पॅकेजिंग

या क्षेत्रांमध्ये मागणी

  • फूड अँड बेव्हरेज
  • औषधे
  • रिटेल
  • सौंदर्य प्रसाधने
  • भाज्या,फळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com