चिमूकलीसह आईवडिल "पॉजिटिव्ह'; कशासाठी आले होते पुण्यावरून कामठीला...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

पुणे येथे वास्तव्यास असलेले 39 वर्षीय महिला, 40 वर्षीय पती व एक चार वर्षीय मुलीला घेऊन हे दाम्पत्य कामठी येथील मेन रोड कल्पना हॉटेल परिसरातील आईची प्रकृती बरी नसल्याने तिला भेटण्यासाठी 25 मे रोजी दाखल झालेली होती. अशात ट्रॅव्हल हिस्ट्री असल्याने प्रशासनाला माहिती देऊन त्यांनी स्वतः होमक्वारंटाइन राहून स्वॅब नमुने तपासणी करण्यास पुढाकार दाखविला.

कामठी /सावनेर (जि.नागपूर) : मेन रोड कल्पना हॉटेल परिसरातील आईची प्रकृती बरी नसल्याने तिला भेटण्यासाठी पुण्यावरून आलेल्या एकाच परिवारातील तीन सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. यात पती, पत्नी व चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. आज बुधवारी दुपारी त्यांचा स्वॅब नमुने तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याची सूचना स्थानीय प्रशासनाला मिळताच तिघांनाही उपचाराकरिता पाठविण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या परिवारातील दोन सदस्यांसह घरी घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबासह नऊ जणांना क्‍वारंटाइन करण्यात आले. परिसरात नागरिकांना ये-जा करणे बंद केले. परिसर सॅनिटायझर करून काही भाग सील करण्यात आला.

हेही वाचा : 1962 नंतर त्यांनी पुन्हा केले आक्रमण, पण काढावा लागला पळ...

ट्रॅव्हल हिस्ट्री
पुणे येथे वास्तव्यास असलेले 39 वर्षीय महिला, 40 वर्षीय पती व एक चार वर्षीय मुलीला घेऊन हे दाम्पत्य कामठी येथील मेन रोड कल्पना हॉटेल परिसरातील आईची प्रकृती बरी नसल्याने तिला भेटण्यासाठी 25 मे रोजी दाखल झालेली होती. अशात ट्रॅव्हल हिस्ट्री असल्याने प्रशासनाला माहिती देऊन त्यांनी स्वतः होमक्वारंटाइन राहून स्वॅब नमुने तपासणी करण्यास पुढाकार दाखविला. प्रशासनाने 26 मे रोजी तिघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले. या तिघांनाही कामठी कळमना मार्गावरील कॅनॉल गार्डन येथे इन्स्टिट्यूट क्‍वॉरंटाइन करण्यात आले होते. आज (ता. 27) दुपारी त्यांचे स्वॅब नमुने तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

हेही वाचा : दोघे सोबत आले, मिळून दारू प्याले,क्षुल्लक कारणावरून झाला वाद आणि...

सोनोली येथे आढळला पॉझिटिव्ह रुग्ण
सावनेर : तालुक्‍यात कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण मुंबईवरून स्वतःच्या घरी दहेगाव रंगारी गावांमध्ये आल्यानंतर आढळून आला. नुकताच मुंबईवरून आलेला सावनेरपासून अवघ्या नऊ-दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कळमेश्वर तालुक्‍यातील सोनोली गावातील युवक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सावनेर व कळमेश्वर तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. पुण्या-मुंबईवरून येणाऱ्या नागरिकांमुळे आता घराबाहेर पडणाऱ्यांचे ठोके वाढायला लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर सावनेर येथील काही लोकांना पुणे-मुंबईला पोचविण्यासाठी सोनोली येथील 25 वर्षीय ड्रायव्हर गेला होता. तो मुंबईवरून सोनोली गावात परत आला. दहा दिवसांनंतर हा युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents with Chimukali "positive";