
विद्यापीठाद्वारे ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात आल्यात. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात निकाल लावण्यात आले. त्यात जवळपास ९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
नागपूर : राज्यातील सर्वच विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालाच्या टक्क्यावर दिसून आला. यावर्षी कधी नव्हे ते निकालात मोठी वाढ झाली. त्यामुळे प्रवेशात चुरस निर्माण झाली. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जागांपेक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या तिप्पट असल्याने हजारावर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याची वेळ आली आहे.
हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत
विद्यापीठाद्वारे ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात आल्यात. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात निकाल लावण्यात आले. त्यात जवळपास ९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यानंतर डिसेंबर महिन्यात बॅकलॉगच्या परीक्षा घेण्यात आल्यात. या परीक्षांमध्येही कधी नव्हे ते सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना नियमित उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही अधिकचे गुण मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे नियमित उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये प्रवेशापासून वंचित राहावे लागले.
हेही वाचा - अन् पराभूत उमेदवार झाला विजयी; ३ दिवसांच्या आंनदोत्सवावर विरजण; नक्की काय घडला प्रकार
कला शाखेचेही दिवस पालटले -
वाढीव निकालाने एम.कॉम., एमएस.स्सी.च्या जागा कमी असल्याने विद्यार्थी मिळत नसल्याचे दिसून आले. मात्र, याच वाढीव निकालाचा फायदा एमए अभ्यासक्रमाला झाल्याचे दिसून येत आहेत. यावर्षी बीए अभ्यासक्रमात ८ हजार ७८३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यामुळे या शाखेत रिक्त जागांची संख्या दरवर्षीपेक्षा वरीच कमी झाल्याचे चित्र आहे. एमए अभ्यासक्रमात विभाग आणि महाविद्यालयात १० हजार ८६५ जागा आहेत.
शाखा | परीक्षार्थींची संख्या | उत्तीर्ण विद्यार्थी | जागा | |
बीएस.स्सी | ९, ८६८ | ९,६३८ | एम.कॉम. | ३ हजार २०८ |
बी.कॉम | १०,६३९ | १०,४१८ | एमएस.स्सी | ४ हजार ९८३ |
बीए | ९,४९३ | ८,७८३ | एमए | १० हजार ८६५ |