गरीबांच्या उपचाराचा मार्ग आता मोकळा, लवकरच साकारणार डॉ. आंबेडकर रुग्णालय

The path of treatment for the poor is now clear, soon Dr. Ambedkar Hospital
The path of treatment for the poor is now clear, soon Dr. Ambedkar Hospital

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र व पदव्यूत्तर संस्था उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात 209 कोटीतून बांधकाम व इतर विभाग सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या बांधकामापासून सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) मात्र दूर ठेवण्यात आले. त्याऐवजी नागपूर सुधार प्रन्यासकडून बांधकाम व्हावे अशी मेयो प्रशासनाने केली आहे. याला पालकमंत्री कार्यालयातूनही दुजोरा मिळाला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे स्वप्न असलेल्या या संस्थेसाठी 2014 मध्ये आघाडी सरकारने केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूर असलेल्या निर्णयानुसार संस्था उभारणीसाठी 209 कोटीची तरतूद केली होती. पहिल्या टप्यात 209 कोटीतून येथे 568 खाटांचे रुग्णालय तयार केले जाणार होते. मात्र सत्ता बदल झाला. राज्यात 2015 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आले आणि डॉ. आंबेडकर रुग्णालयाचा प्रस्ताव बारगळला. मात्र 2019 मध्ये नव्याने आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने डॉ. आंबेडकर रुग्णालय उभारणीच्या निर्णयाला हिरवी झेंडी दिली. औषधशास्त्र, शल्यक्रिया, हृदयरोग, हृदय शल्यक्रिया, मेंदूरोग, मेंदू शल्यक्रिया मूत्रपिंड, फुफ्फुस, बालरोग, बाल शल्यक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती, कान-नाक-घशासह एकूण 27 अतिविशेषोपचाराच्या सोयी असलेले विभाग तयार करण्यासंदर्भात आराखडा तयार केला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकामाच्या प्रक्रियेला होणारा विलंब व बांधकामासाठी येणारा अतिरिक्त खर्च बघता हे काम नागपूर सुधार प्रन्यासने करावे असा सूर पुढे आला.

अधिष्ठाता कार्यालयात बैठक

नुकतिच मेडिकलमध्ये डॉ. आंबेडकर रुग्णालयात पदव्यूत्तर संस्था व सुपरस्पेशालीटी रुग्णालयाच्या 209 कोटीतून होणाऱ्या कामाचा आराखडा तयार करण्यासंदर्भातील विषयावर बैठक झाली. तातडीने पहिल्या टप्यातील बांधकामाचा आराखडा खासगी आर्टिटेक्‍टद्वारे तयार करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. तातडीने हा प्रकल्प कार्यान्वीत करून येथे जागतिक दर्जाची रुग्णसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा असल्याची माहिती मेडिकल प्रशासनाकडून मिळाली आहे. लवकरच मुंबईत वरिष्ठ स्तरावरील बैठकीत मंजूरी मिळण्याचे संकेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com