संचारबंदीतही केला आगाऊपणा, तुकाराम मुंढेंच्या आदेशाने या प्रतिष्ठानांवर कारवाई

tukaram-munde
tukaram-munde

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी जनता कर्फ्यूनंतर मोठ्या प्रमाणात नागपूरकरांनी आजही घरातून बाहेर निघण्याचे टाळले. काही अत्यावश्‍यक सेवा पुरविणारे विविध संस्थांचे कर्मचारी अधिकारी कार्यालयात पोहोचले. या कर्मचारी, अधिकाऱ्यांमुळे सकाळी दहा ते अकराच्या सुमारास शहरातील काही रस्त्यांवर वाहने दिसून आली. मात्र, काही बेजबाबदार नागरिक किंवा तरुण विनाकारण रस्त्यांवर उतरल्याने दुपारीही काल निर्मनुष्य दिसणारे रस्त्यांवर थोड्या प्रमाणात वर्दळ दिसून आली. त्यामुळे प्रशासनाची संचारबंदी यशस्वी करण्याच्या प्रयत्नाला सुरुंग लागला. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही काही भागात दौरा केला.
शहरातील अत्यावश्‍यक सेवेत न मोडणारी दुकानेही सुरू होती.वर्धमाननगर येथील ठवकर कंपनीत कामगार काम करताना आढळून आले. याच भागातील हनी सागर अपार्टमेंटमधील बजाजचे शो रुमही मागील दाराने सुरू असल्याचे आढळून आले. खासगी, कॉर्पोरेट व अन्य आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिलेले असतानाही कंपनीत सुमारे 60-70 कर्मचारी काम करताना आढळून आले. या कंपनीनेही अर्धवट शटर सुरू ठेऊन काम सुरू ठेवले होते. याबाबत महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच आयुक्तांच्या निर्देशानंतर लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव आणि उपद्रव शोध पथकाच्या पथकाने धाड घालत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. बजाजच्या शो रुमवरही अधिकाऱ्यांनी धाड घातली. शो रुम मालकाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
शहरात विनाकारण फिरणाऱ्या तरुणांनाही पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. व्हेरायटी चौक, हिंगणा नाकासह शहरातील विविध भागात पोलिसांनी रस्त्यांवर विनाकरण फिरणाऱ्या नागरिक, तरुणांना कान पकडून उठा-बशा करायला लावले. दरम्यान, शहरात आजही पोलिसांचा कडा पहारा दिसून आला. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही काही भागात दौरा केला. शहरातील मोमीनपुरा, इतवारी, महाल या व्यापारी भागात गर्दी दिसून आली. नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले असतानाच अनेक ठिकाणी पाच ते सहा जणांत गप्पांचा फड रंगला.
शहरातील बेजबाबदार तरुण, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडत जनता कर्फ्यूनिमित्त नागपूरकरांनी रविवारी दाखविलेल्या संयमावर आज विरजण पाडले. एवढेच नव्हे जिल्हा प्रशासनाचे अत्यावश्‍यक सेवा वगळता दुकाने, आस्थापना, उद्योग बंद करण्याचे आदेशही काहींनी झुगारल्याने कोरोना विषाणूविरुद्ध लढ्यात योगदानासाठी नागपूरकरांवर आता सक्तीचीच आवश्‍यक असल्याची भावनाही सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, विनाकारण रस्त्यांवर निघणाऱ्यांवर पोलिस तसेच आस्थापना, दुकाने, उद्योग सुरू करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करीत सक्तीने कारवाईचे संकेत दिले.
शहरात विनाकारण फिरणाऱ्या तरुणांनाही पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. व्हेरायटी चौक, हिंगणा नाकासह शहरातील विविध भागात पोलिसांनी रस्त्यांवर विनाकरण फिरणाऱ्या नागरिक, तरुणांना कान पकडून उठा-बशा काढायला लावल्या. दरम्यान, शहरात आजही पोलिसांचा कडा पहारा दिसून आला. शहरातील मोमीनपुरा, इतवारी, महाल या व्यापारी भागात गर्दी दिसून आली. नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले असतानाच अनेक ठिकाणी पाच ते सहा जणांत गप्पांचा फड रंगला.

दुकानदारांकडून सोशल डिस्टन्स
शहरातील किराणा दुकान, औषधी दुकाने सुरू करण्यात आली. भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांचीही दुकाने सुरू असल्याने काही नागरिकांनी गर्दी न करता खरेदीसाठीही संयम बाळगला. मात्र औषध विक्रेते, किराणा दुकानदारांनी ग्राहकांना 'सोशल डिस्टन्स' ठेवण्याची विनंती केली. काही दुकानदारांनी दुकानाच्या काऊंटरपुढे एक मीटर अंतराचे बॅरिकेड्‌स लावले.

कार, ऑटो सुरूच
शहरातील अनेक भागात चारचाकी वाहने सुरू दिसून आली. एवढेच नव्हे तर ऑटोमध्येही प्रवाशांना कोंबून नेताना दिसून आले. वाहनांना बंदीचे मनपा आयुक्तांनी आदेश काढले आहेत. मात्र, मनपा आयुक्तांचेही आदेश नागरिकांनी झुगारल्याचे चित्र होते. पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात आली. अत्यावश्‍यक सेवेतील वाहने सोडण्यात आली तर काही चालकांना इशारा देण्यात आला.
कडक कारवाई होणार
नागरिकांच्या आरोग्यासाठी कोरोना विषाणूला रोखण्याकरिता प्रशासनाने पाऊले उचलली. परंतु वेळोवेळी सांगूनही जर नागरिक कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल
 तुकाराम मुंढे, मनपा आयुक्त.

संचारबंदी पाळावी
लोकांनी एकत्र येऊ नये, यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. अत्यावश्‍यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. लोकांनी संचारबंदीत घराबाहेर येऊ नये.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com