आता पावसाळी पर्यटन करता येणार, एक जुलैपासून मिळेल ही सुविधा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

ताडोबा- अंधारी व पेंच व्याघ्रप्रकल्प एक जुलैपासून फक्त बफर क्षेत्रात रस्ते चांगले असलेल्या ठिकाणी मर्यादित स्वरुपात सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. नवेगाव-नागझिरा व बोर व्याघ्रप्रकल्पात कोविड 19 करिता आवश्‍यक सोयी सुविधा नसल्याने तेथे पर्यटन सुरू होणार नाही. पावसाळ्यानंतर एक ऑक्‍टोबरपासून नेहमीप्रमाणे पर्यटन सुरू करता येणार आहे.  

नागपूर :  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानातील बंद असलेली जंगल सफारी एक जुलैपासून मर्यादित स्वरूपात सुरू होणार आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील जंगल सफारी सुरू झालेली आहे. पर्यटकांना सफारी करताना मात्र, राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या कोरोना नियमावलीचे नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. 

ताडोबा- अंधारी व पेंच व्याघ्रप्रकल्प एक जुलैपासून फक्त बफर क्षेत्रात रस्ते चांगले असलेल्या ठिकाणी मर्यादित स्वरुपात सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. नवेगाव-नागझिरा व बोर व्याघ्रप्रकल्पात कोविड 19 करिता आवश्‍यक सोयी सुविधा नसल्याने तेथे पर्यटन सुरू होणार नाही. पावसाळ्यानंतर एक ऑक्‍टोबरपासून नेहमीप्रमाणे पर्यटन सुरू करता येणार आहे.  

मोठी बातमी : युवकाचा 'फिल्मी स्टाईल'ने तलवारीने भोसकून खून
 
जिल्हाधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाने कोविड 19 बाबत घालून दिलेल्या नियमाप्रमाणे व मार्गदर्शक सूचनांचे अधिन ही परवानगी दिली आहे. इतर अभयारण्यात व्यवस्थापन आराखड्यामध्ये निसर्ग पर्यटनासंबंधी असलेल्या तरतुदीनुसार तसेच रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन मर्यादित स्वरूपात निसर्ग पर्यटनाला परवानगी राहणार आहे, असे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी काढले आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pench, Tadoba Safari Will Start From 1 July