बॅंड विषयात "पीएचडी', जीवनाचे गीत मात्र बेसुरेच; एका प्राध्यापकाची व्यथा..

file
file

केळवद/देवलापार (जि. नागपूर)  :  मी मूळचा केळवदचा. येथे मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे. मातंग समाजाची गरिबी, दारिद्य्र मी जवळून पाहिले आहे. मी स्वत: बॅंड वाजविला आहे. शिक्षणामुळे मी मोठा झालो. बॅंड याच विषयात पीएचडी केली, तरी माझ्या समाजाची अवस्था फार वाईट असून समाजावर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने समाजाची व्यथा समजून घ्यावी, असे भाष्य नागपूर येथील कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राध्यापक अशोक कांबळे यांनी लॉकडाउन पार्श्‍वभूमीवर समाजातील व्यावसायिकांच्या एकंदर दशेवर केले.

"बॅंड' व्यवसायाचे हरपले सूर
समाजातील गरजूंना मी स्वतः आणि पत्नी सुचिता दोघांनी लॉकडाउनदरम्यान आर्थिक मदत केली. परत समाजाला मदत करेन, लॉकडाउनमुळे विवाहसमारंभ रद्द झाल्याने बॅंड पथकावर अवलंबून असणाऱ्यांना आता ऍडवान्स द्यायला बॅंडमास्टर तयार नसल्याने, विशेषत: ग्रामीण भागातील बॅंड कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, अशात मातंग समाजातील बॅंड वाद्द कलाकारांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणीही प्रा. अशोक कांबळे यांनी केली.

व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्नसोहळे, जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम, विवाह व नंतर होणारे स्वागतसोहळे आदी रद्द करण्यात आले आहेत. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने बॅंड पथकासाठी खूप महत्त्वाचे असतात. या तीन महिन्यांत होणाऱ्या कमाईवरच त्यांचा पोटाचा प्रश्न मिटतो. ऐन हंगामात कोरोनाचे संकट आल्याने बॅंडवाले अडचणीत सापडलेत.लग्नसोहळे असो वा महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी. त्या ठिकाणी बॅण्डवाल्यांना आवर्जून मागणी असते. लग्नसोहळ्यात महत्त्वाचे आकर्षण असणारे बॅण्डवाले कोरोनाच्या दुष्टचक्रात सापडलेत. बॅंडच्या तालावर तरुणाई ठेका धरताना दिसते. मात्र, त्यामागे त्यांचे कष्ट आहेत.

तरुणाई डोलावते, यामागे कलावंताची मेहनत
हंगामाच्या अगोदर सिनेमातील गाजलेल्या गाण्यांची तयारी केली जातात. एका गाण्याची तयारी दोन-तीन दिवसांत केली जाते. वाद्यवृंदात 15 ते 20 जण असतात. यंदा विवाहाचे तब्बल 50 ते 60 मुहूर्त होते. जास्त असल्याने यावर्षी चांगली कमाई होणार, अशी कलाकारांना आशा होती. मुहूर्त अधिक असल्याने वधू-वरांच्या पालकांनी सोयीने मुहूर्त धरले. एका लग्नासाठी बॅण्डवाले 10 ते15 हजार रुपये घेतात. मुहूर्त असल्याने बॅण्डचे बुकिंगही झाले होते. सुगीचे दिवस येणार; पण अचानक कोरोनाचे संकट देशावर आले. देश लॉकडाउन करण्यात आला. लग्नसोहळे रद्द करण्यात आले. लग्नासाठी बुकिंग केलेल्या बॅण्डपार्टींना नाइलाजाने रद्द करावे लागत आहे. त्यामुळे बॅण्ड व्यावसायिकांना सरकारने मदत करावी, अशी मागणी अनिल भलावी (गोंडवाना धुमाल पार्टी वडांबा), रवी गेडाम (गोंडवाना पंजाबी पार्टी), कमलेश वनदिये (बाबा लाल दिवान शाह धुमाल पार्टी डोंगरताल), शैलेश मेश्राम (त्रिरत्न धुमाल पार्टी बौद्ध टोला देवलापार), राहुल उईके (डी. जे. वादक झिझेरीया), बंटी वरठी (डी. जे. वादककट्टा) यांनी केली आहे.

आर्थिक मदतीची अपेक्षा
लॉकडाउनमध्ये या समाजाला सामाजिक स्तरातून पाहिजे तितकी मदत झाली नसल्याने, अशास्थितीत मातंग समाजाच्या हजारो कुटुंबांसाठी उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आहे. या समाजाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गंगाधर वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, वंसता खडसे, भैया सनेसर, मधुकर सनेसर, सुभाष वाघमारे या बॅंड व्यावसायिकांनी केली आहे.

मदत किती दिवस
माणुसकी टिकून असल्याने बॅंड पथकातील वाद्य कलावंतांना आम्ही ऍडवान्स तसेच इतर मदत करीत आहोत. ही मदत किती दिवस करायची, असा प्रश्न बॅंडप्रमुखांना पडत असल्याने सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बॅंड पथकातील कलाकारांना आर्थिक मदत द्यावी.
-श्‍याम गवई
सरस्वती बॅंड पार्टीप्रमुख,
नागपूर.  

 


 :

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com