
नागपूर : रस्त्याच्या कामासाठी जलवाहिनीच्या आंतरजोडणीची चार दिवसांपासून सुरू असलेली कामे पूर्ण केली. मात्र, जिथे आंतरजोडणीची कामे करण्यात आली, त्याच ठिकाणी २४ तासांत पुन्हा जलवाहिनी फुटली. त्यामुळे पारडी, पारडी-१ व भांडेवाडी जलकुंभांतर्गत येणाऱ्या एक लाख नागरिकांना पुन्हा दिवस पाण्याशिवाय काढावे लागणार आहे. यानिमित्त राष्ट्रीय महामार्ग (एनएचएआय) अधिकाऱ्यांच्या कामाचेही पितळ उघडे पडले.
पारडी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्याची कामे करीत आहे. या रस्त्याच्या कामात जलवाहिनीला नुकसान होऊ नये, म्हणून ७०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीशी पारडी व भांडेवाडी जलकुंभाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम एनएचएआयने ७ मार्चपासून सुरू केले. ही कामे उरकण्यासाठी एनएचएआयने २४ तासांचा अवधी मागितला होता. त्यामुळे ७ मार्चपासून पारडी व भांडेवाडी जलकुंभातून पाणीपुरवठा बंद आहे. परंतु, एनएचएआयने ८ मार्चला कामे उरकण्याऐवजी १० मार्चपर्यंत कामे केली. त्यामुळे चार दिवस पारडी, पारडी-१, भांडेवाडी जलकुंभाअंतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या वस्त्यांमध्ये ठणठणाट होता. यातूनच बुधवारी लकडगंज कार्यालयावर नागरिकांनी धडक देऊन तोडफोड केली. काल १० मार्चला एनएचएआयने कामे उरकल्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा पारडीजवळ जिथे कामे केले, तिथेच ही जलवाहिनी फुटली. अर्थात, २४ तासांमध्येच जलवाहिनी फुटल्याने एनएचएआय अधिकाऱ्यांच्या निकृष्ट कामाचेही पितळ उघडे पडले.
आठवडाभर नागरिक पाण्याशिवाय -
चार दिवस पाणी नसल्याने बुधवारी नागरिकांनी झोन कार्यालयावर आंदोलन केले. बुधवारी दुपारपर्यंत कामे पूर्ण केल्यामुळे सायंकाळी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. गुरुवारी पुन्हा जलवाहिनी फुटली असून उद्याही दुरुस्तीची कामे शक्य नसल्याचे समजते. त्यानंतर शनिवार, रविवार असल्याने सोमवारीच ही कामे होणार आहेत. त्यामुळे ७ मार्चपासून पाण्याशिवाय असलेल्या लाखावर नागरिकांना आता पाण्यासाठी १५ मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. परिणामी आठवडाभर येथील नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.