आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या हो! विलगीकरणातील नागरिकांचा टाहो!!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

जवाहरनगर येथील काही नागरिकांना विलगीकरणात ठेवले असून याशिवाय इतरही परिसरातील नागरिक येथे आहेत. यांना नमुने घेण्यासाठी दररोज मेयोत नेण्यात येत आहे. यानंतर इतरही तपासण्यांसाठी नेले जाते. मात्र, तपासणी न करताच दोन तीन तास मेयोत ताटकळत ठेवण्यात येते आणि तपासणीशिवाय परत आणले जात आहे.

नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही नागरिकांना रविभवन येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विलगीकरणातील नागरिकांना दररोज मेयोत चाचणीसाठी घेऊन जाण्यात येत असून चाचणी न करताच परत आणले जात आहे. यामुळे या विलगीकरणातील नागरिक संतप्त झाले आहेत. विशेष असे की, येथील कॅंटिन कंत्राटदाराने कॅंटिन बंद केल्यानंतर येथे खाण्यापिण्याच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणाला कंटाळून येथील नागरिकांनी आम्हाला आमच्या घरी सोडा, आम्ही घरातच राहू, अशी हमी दिली.

अवश्य वाचा : सतत प्रियकरासोबत फोनवर बोलत होती पत्नी, पतीने अर्ध्या रात्री केले हे...

जवाहरनगर येथील काही नागरिकांना विलगीकरणात ठेवले असून याशिवाय इतरही परिसरातील नागरिक येथे आहेत. यांना नमुने घेण्यासाठी दररोज मेयोत नेण्यात येत आहे. यानंतर इतरही तपासण्यांसाठी नेले जाते. मात्र, तपासणी न करताच दोन तीन तास मेयोत ताटकळत ठेवण्यात येते आणि तपासणीशिवाय परत आणले जात आहे. यासंदर्भात विचारणा केली असता, कोणीही "ब्र' काढत नाही. कोणीही सरळ उत्तर देत नाही, यामुळे संतप्त झालेल्या विलगीकरणातील महिलांनी रविभवन परिसरात आरडाओरड केली. विलगीकरणातील काही नागरिकांना 14 दिवसांचा कालावधी लोटून गेला. कोणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. तरीही अद्याप विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे; त्यामुळे अनेक नागरिक संतप्त झाले आहेत. विलगीकरणातील व्यक्तींच्या अहवालाबाबत मनपाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासनात समन्वय नाही. यामुळे घोळ होत असल्याची तक्रार विलगीकरणातील नागरिकांनी केली. विलगीकरणातील नागरिकांशी संवाद साधला असता, त्यांनी आम्ही प्रशासनाला मदत करतो. त्यांनी सांगितले की, येथे राहा तर निमूटपणे राहात आहोत. परंतु, आमच्या चाचण्यांचा अहवाल आला आहे किंवा नाही, याबाबत विचारणा केली, तर प्रशासनाकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.

परिसरात आरडाओरड

एक महिलेला मंगळवारी सकाळी मेयोत तपासणीसाठी नेले. मात्र, तपासणी न करता पुन्हा रविभवनात परत आणले. यामुळे या महिलेने विचारणा केली. मात्र, कोणीही बोलत नव्हते. अखेर या महिलेने आरडाओरड केली. मात्र, यानंतरही याकडे कोणी लक्ष दिले नाही. आम्हाला आमच्या घरी सोडा, अशी मागणी या महिलेने यावेळी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Please send us to our home