जुगार आणि  दारूच्या खर्चासाठी करायचा चोरी; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

police arrested man who theft for his bad habits
police arrested man who theft for his bad habits

नागपूर : दारूचे जबर व्यसन त्यात जुगार खेळण्याची सवय लागली. त्यासाठी लागणाऱ्या पैशांची निकड भागविण्यासाठी चोऱ्या करणे सुरू केले. ओळखीच्या ठिकाणीच चोऱ्या करीत पसार व्हायचा. पोलिसांनी त्याला हुडकून काढील मुसक्या आवळल्या. खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याच्याकडून चोरीचे वाहन आणि अन्य मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.

राजेंद्र सदाशिव भोयर (३५) रा. रहाडी, ता. मौदा असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. जुगार व दारूचे व्यसन भागविण्यासाठी तो चोऱ्या करू लागला. अन्य ठिकाणी चोरी करताना सापडल्यास मार खावा लागण्याची भीती होती. यामुळे तो ओळखीच्यांनाच लक्ष्य करायचा. 

प्रारंभी त्याने गावातच चोरी केली. त्यानंतर मौदा येथील रिलायन्स कंपनीतून केबल चोरून नेले. यानंतर पळून तो नागपुरात आला. नंदनवन हद्दीतील शक्तीमातानगरात दुर्गेश हिरणखेडे नावाचा मित्र राहतो, १७ ऑक्टोबर रोजी त्याचे घर गाठले. त्याच वेळी दुर्गेशचा राजेश वझरकर नावाचा आणखी एक मित्र त्याचे मालक देवेंद्र अग्रवाल यांची दुचाकी घेऊन आला. छोटेखाना पार्टीनंतर तिघेही तिथेच झोपी गेले. 

त्याच रात्री ३ वाजता दुर्गेशला जाग आली, तोवर राजेंद्र दुचाकी व मोबाईल घेऊन पसार झाला होत. दुर्गेशच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

दरम्यान, त्याला मौदा येथील चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची मध्यवर्ती कारगृहात रवानगी करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी ३ नोव्हेंबर रोजी प्रोडक्शन वॉरंटवर त्याला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली.

न्यायलयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली होती. सखाल चौकशीत त्याने चोरीची कबुली देण्यासह चोरीचे वाहन व मोबाईलबाबतही माहिती दिली. त्या आधारे वाहन व मोबाईल हस्तगत करण्यात आला.


संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com