esakal | "वडिलांना कॅंसर आहे, सोने विकायचे आहे", अशी थाप देत कमवले २१ लाख; अखेर पोलिसांनी केली अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

police arrested thief who theft gold of rupees 21 lakhs

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शेंडे (३७, रेल्वे कॉलनी. प्रतापनगर) हे एका नामांकित कॉलेजवर प्राध्यापक असून ते कुटुंबासह ५ ऑगस्ट २०१९ ला बाहेरगावी राहणाऱ्या नातेवाईकाकडे चौदावीच्या कार्यक्रमाला गेले होते.

"वडिलांना कॅंसर आहे, सोने विकायचे आहे", अशी थाप देत कमवले २१ लाख; अखेर पोलिसांनी केली अटक 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः गेल्या दीड वर्षांपूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा लावून दोन चोरट्यांकडून २१ लाखांचे सोने पोलिसांनी जप्त केले. मोठ्या शिताफीने पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. दोन्ही आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त नरूल हसन यांनी पत्रपरिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शेंडे (३७, रेल्वे कॉलनी. प्रतापनगर) हे एका नामांकित कॉलेजवर प्राध्यापक असून ते कुटुंबासह ५ ऑगस्ट २०१९ ला बाहेरगावी राहणाऱ्या नातेवाईकाकडे चौदावीच्या कार्यक्रमाला गेले होते. दरम्यान त्यांच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी ४५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रूपये रोख लंपास केले होते. 

सविस्तर वाचा - बापरे! धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्याला सापडले सोने; लक्ष्मीपूजनाला तीन गावात दवंडी देऊन केले परत

या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अमोल महादेव राऊत (३२, बुटीबोरी) याला अटक केली. त्याच्याकडून ३५ हजार रूपये जप्त केले होते. त्याने तपासात चोरीचे सोने श्रीकांत जीवन निखाडे (२९,रा.तितूर, कुही ) याचे नाव सांगितले. पोलिसांनी श्रीकांतला आरोपी केले आणि त्याचा शोध सुरू केला. मात्र तो पोलिसांना वारंवार गुंगार देत होता. त्याला फरार घोषित करण्यात आले. 

गेल्या दिड वर्षांपासून आरोपी पोलिसांना चकमा देत असल्यामुळे डीसीपी नुरूल हसन यांनी बजाजनगरचे ठाणेदार महेश चव्हाण यांना आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले.त्यावरून बजानगरचे डीबीचे गोवींदा बारापात्रे, गौतम रामटेके, अमित गिरडकर आणि सुरेश वरूडकर यांनी आरोपीला अटक करण्यासाठी सापळा रचला. मात्र वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होता. त्यामुळे पोलिसांनी आशा सोडली होती.

चोर बनला ट्र्क ड्रायव्हर

आरोपी श्रीकांत निखाडे याने अटक होण्याच्या भीतीने नागपूर सोडले आणि भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे ट्रक ड्रायव्हर म्हणून नोकरी करायला लागला.त्याने नाव बदलले आणि मोबाईल वापरणे बंद केले. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शेवटी ठाणेदार चव्हाण यांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून श्रीकांतला अटक केली.

अधिक वाचा - "भूषण शहिद झाला आता दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवणार"; दुःखात बुडालेल्या देशभक्त मातेचे उद्गार

असे मिळाले सोन्याचे घबाड

प्रा. शेंडे यांच्या घरातून जवळपास अर्धा किलो सोने चोरल्यानंतर मुख्य आरोपी अमोल राऊतने सोने श्रीकांतला दिले होते. श्रीकांतने ते सोने प्रकाश मारोतराव पंचभाई (४५, शेगावनगर,बहादूरा) याला दिले. प्रकाशने सराफा व्यापारी दुर्गेश केशवराव सुरपाटणे (४६, बेसा) याला विकले. ‘वडीलाला कॅंसर असल्यामुळे सोने विकायचे आहे, अशी थाप त्याने सराफाला दिली होती. सराफाने ३९५ ग्रॅम सोने विकत घेत त्याला २० लाख ५४ हजार रूपये दिले होते.

संपादन - अथर्व महांकाळ