esakal | ओयो हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर छापा; तीन महिलांसह चौघे ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Police have arrested three prostitutes

आयो हॉटेलमध्ये एकटा आलेल्या आंबटशौकीन ग्राहकांना प्रवेशद्वारावरच असलेला भूषण भेटत होता. त्याला थेट तरुणी असल्याचे सांगण्यात येत होते. त्याने होकार देताच तो रंजनाला फोन करून दोन्ही तरुणींना ग्राहकाच्या खोलीत पाठवत होता. त्यापैकी पसंती दर्शवून सौदा ठरत होता. रंजनाच्या हाती पैसे दिल्यानंतर तरुणी ग्राहकासोबत रूममध्ये जात होती.

ओयो हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर छापा; तीन महिलांसह चौघे ताब्यात

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : मनीषनगरातील आयो हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात देहव्‍यापार करणाऱ्या दोन वारांगनांसह दोन दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रंजना चतुर्भुज मेश्राम (४०, रा. गोधनी, म्हाडा कॉलनी) आणि भूषण जेटूराम माहुले (२२, रा. संगमचाळ) अशी दलालांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना मेश्राम आणि तिचा साथीदार भूषण माहुले यांनी बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगरात असलेल्या कृष्णकुंज ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू केले होता. हॉटेलमध्ये दोन तरुणींना त्यांनी मुक्कामी ठेवले होते. त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतला जात होता.

आयो हॉटेलमध्ये एकटा आलेल्या आंबटशौकीन ग्राहकांना प्रवेशद्वारावरच असलेला भूषण भेटत होता. त्याला थेट तरुणी असल्याचे सांगण्यात येत होते. त्याने होकार देताच तो रंजनाला फोन करून दोन्ही तरुणींना ग्राहकाच्या खोलीत पाठवत होता. त्यापैकी पसंती दर्शवून सौदा ठरत होता. रंजनाच्या हाती पैसे दिल्यानंतर तरुणी ग्राहकासोबत रूममध्ये जात होती.

हेही वाचा - ज्येष्ठांना सोडून कनिष्ठांना ‘ठाणेदारी’?; ज्युनिअर जोमात, सीनिअर कोमात

पंटर पाठवून केली कारवाई

ओयो हॉटेलमध्ये तरुणी देहव्यापार करीत असल्याची माहिती एसएसबीच्या पीआय तृप्ती सोनवणे, पीएसआय स्मिता सोनवणे यांना मिळाली. शनिवारी सायंकाळी पंटर पाठविण्यात आला. पंटरने रंजनाला तरुणीची मागणी केली. रंजनाने पैसे आणि हॉटेलमधील खोलीच्या भाड्यासह रक्कम घेतली. त्यानंतर दोन तरुणींनी खोलीत पाठवले. पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा घालून रंजना, भूषण यांना अटक केली तर दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले.

संपादन - नीलेश डाखोरे