पोलिसांमध्ये 'कभी खुशी, कभी गम', वाचा काय आहे कारण...

Police officers await promotion
Police officers await promotion
Updated on

नागपूर : राज्यातील शेकडो पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची उत्सुकता आहे. पदोन्नतीला होत असलेला उशीर बघता राज्यभरातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्‍य आले आहे. पोलिस महासंचालक कार्यालयात पदोन्नतीची फाइल कुठे अडकली, याबाबत अनेकांना प्रश्‍न पडला आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक पोलिस अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी अजून तयारी झाली नाही. तसेच काही पोलिस अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी नुकतची 'फ्लॅश' झाली. मात्र, अनेकांची नावे यादीत होती, तर काहींची नावे नव्हती. त्यामुळे 'कभी खुशी कभी गम' अशी स्थिती निर्माण झाली. वर्ष 2019 मध्ये अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांची पूर्तता होण्यास उशीर झाल्यामुळे पदोन्नत्या रखडल्याची चर्चा आहे.

पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि हवालदारांच्या पोलिस उपनिरीक्षक पदावर बदोन्नत्या थांबल्या असल्यामुळे अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी पोलिस आस्थापना विभागाने 1500 पोलिस उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी बढती दिली. 500 सहायक पोलिस निरीक्षकांनाही पोलिस निरीक्षकपदी बढती दिली. तसेच 120 पोलिस निरीक्षकांना डीवायएसी-एसीपी म्हणून बढती दिली आहे. मात्र, यात अनेक पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश नसल्याने त्यांच्यात नैराश्‍य निर्माण झाले आहे. 

2013@ पीएसआय

पोलिस महासंचालक कार्यालयाच्या वतीने 2013 मध्ये खात्याअंतर्गत पोलिस हवालदारांसाठी पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेत उत्तीर्ण झालेले अद्याप 12 हजार पोलिस हवालदार "टू स्टार' मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आस्थापना विभाग आणि गृहमंत्रालयाच्या सुस्त धोरणाचा फटका हवालदारांना बसला आहे. पदोन्नती मिळत नसल्यामुळे हवालदारांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला आहे. 

चर्चा करून पदोन्नतीबाबत निर्णय
पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर पदोन्नती दिली आहे. या वर्षीच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी आणि गृहमंत्रालयाशी चर्चा करून पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच 2013 अर्हता परीक्षेत उत्तीण पोलिसांच्या पीएसआय पदोन्नतीबाबत चर्चा सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. 
- राजेश प्रधान, 
आस्थापना विभाग, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com