esakal | मिडास ओयो हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर छापा; तीन तरुणींची सुटका

बोलून बातमी शोधा

Police release two girls Nagpur crime news}

पोलिसांनी गुगल पेद्वारे त्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले. त्याने वर्धा मार्गावरील मिडास ओयो हॉटेलमध्ये बोलाविले. पोलिसांनी सापळा रचून देवेंद्र याला अटक केली. तिघींची सुटका केली. देवेंद्र ऊर्फ कुणाल हरिशंकर पटेल (२८, रा. सुहागपूर, जि. होशंगाबाद, म. प्र.) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिडास ओयो हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर छापा; तीन तरुणींची सुटका
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : इंजिनिअर असलेल्या युवकाने सुरू केलेल्या ऑनलाइन सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला. छाप्यात कोलकत्याच्या दोन व पाटण्यातील एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर दलाल देवेंद्र ऊर्फ कुणाल हरिशंकर पटेल (वय २८, रा. होशंगाबाद, मध्यप्रदेश) याला अटक केली.

या ऑनलाइन देहव्यापाराचा सूत्रधार रेहान व राज असून, रेहान याच्याविरुद्ध यापूर्वीही चार गुन्हे दाखल आहेत. देवेंद्र पटेल केमिकल इंजिनिअर असून तो बुटीबोरीतील एका कंपनीत कामाला होता. लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली. त्यानंतर तो रेहान व राजच्या संपर्कात आला. दोघांच्या मदतीने देवेंद्र याने ऑनलाइन देहव्यापाऱ्याला सुरवात केली.

याबाबत गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सार्थक नेहते, महिला पोलिस उपनिरीक्षक मंगला हरडे, स्मीता सोनवणे, रिना जाऊरकर, सुजाता पाटील यांनी सापळा रचला. पोलिसांनी देवेंद्र याच्याशी संपर्क साधला. तीन तरुणींची मागणी केली. ४२ हजार रुपये लागतील, असे तो म्हणाला.

अधिक माहितीसाठी - नागरिकांनो! सोन स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?